कलाकारांचं लग्न, प्रेग्नंसी, त्यांची मुलं याबाबत चाहत्यांना प्रचंड उत्सुकता असते. नवीन लग्न झालेल्या अभिनेत्रींच्या प्रेग्नंसीच्या तर अनेक चर्चा रंगतात. असंच काहीसं अभिनेत्री अथिया शेट्टीच्या बाबतीत घडलं होतं. मात्र नंतर तिने स्वतःच अधिकृतरित्या सोशल मीडियाद्वारे पोस्ट शेअर करत चाहत्यांना गुडन्यूज दिली. २४ मार्चला पुन्हा तिने एक सुंदर पोस्ट शेअर केली. याचदिवशी अथिया व केएल राहुल आई-बाबा झाले. अथिया व केएल राहुलच्या घरी चिमुकलीचं आगमन झालं. दरम्यान सुनिल शेट्टींनाही यावेळी आनंद अनावर झाला. आता संपूर्ण कुटुंब सध्या चिमुकलीबरोबर आनंदाने वेळ घालवत आहेत. आता पहिल्यांदाच अथिया व केएल राहुलने लेकीला सगळ्यांसमोर आणलं आहे. (Athiya Shetty daughter name and photo)
अथिया व केएल राहुलची गोड लेक
२५ दिवसांनंतर अथियाने एक सुंदर पोस्ट शेअर केली. यामध्ये दोघंही आपल्या लेकीबरोबर खेळताना दिसत आहे. केएल राहुलने मुलीला उचलून घेतलं आहे. तर अथिया तिच्याशी संवाद साधत आहे. या फोटोमध्ये अथिया व केएल राहुलच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद काही औरच आहे. लेकीच्या जन्मानंतर हे सेलिब्रिटी कपल त्यांचं आयुष्य नव्याने जगत आहे. तसेच पहिल्यांदाच त्यांनी लेकीचं नावंही सांगितलं आहे. नावासह त्याचा अर्थही सांगितला आहे.
आणखी वाचा – “बांदेकरांच्या हृदयाचे ठोके मंदावले अन्…”, मृत्यूच्या बातमीवर भडकले आदेश बांदेकर, अनेकांचे फोन आले अन्..
लेकीचं नाव ठेवलं…
अथिया व केएल राहुलने लेकीचं नाव इवारा ठेवलं आहे. हे नाव अगदी खास आणि युनिक आहे. अथियाने या नावाचा अर्थ समजावून सांगितला. इवारा म्हणजे देवाने दिलेलं सगळ्यात सुंदर गिफ्ट. अथिया व केएल राहुलने पोस्ट शेअर करताच कमेंट्सचा पाऊस पडला आहे. मलायका अरोरा, अनुष्का शर्मा, अर्जुन कपूर यांनी कमेंट करत कौतुक केलं आहे. तर अनेकांनी अथिया व केएल राहुलच्या मुलीचं युनिक नाव आवडलं आहे.
गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये गरोदर असल्याचं अथियाने सगळ्यांना सांगितलं होतं. एप्रिलमध्ये तिची प्रेग्नंसी होती. मात्र मार्च महिन्यात अथियाने गोड मुलीला जन्म दिला. अथियाने तिचं गरोदरपण अगदी एन्जॉय केलं. गरोदरपणात तिने केलेलं फोटो चर्चेचा विषय ठरलं होतं. लेकीला मुल होताच सुनिल शेट्टी तर भारावून गेले होते. आजोबा म्हणून मिरवताना ते अगदी खुश दिसले. २०२३मध्ये अथिया व केएल राहुल थाटामाटात लग्न केलं. लग्नच्या दोन वर्षांमध्येच दोघांनी ही गुडन्यूज दिली.