काही कलाकार मंडळी असे असतात जे कलाविश्वात काम करत असताना मोजकं आणि ताकदीच्या कामाची निवड करतात. स्क्रीनवर दिसणं वा अभिनयाची आवड जोपासणं हा एकमेव उद्देश्य असला तरी ही कलाकार मंडळी त्या भूमिकेचा विशेष अभ्यास करताना दिसून येतात. या अभिनेत्रींमध्ये एक नाव आवर्जून घेतलं जात ते म्हणजे अभिनेत्री सुचित्रा बांदेकर. सुचित्रा बांदेकर यांनी त्यांच्या अभिनयाच्या जोरावर स्वतःचा असा फॅन फॉलोविंग तयार केला आहे. बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणाऱ्या ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटात सुचित्रा बांदेकर दिसल्या. या चित्रपटातील त्यांची भूमिका आणि त्यांच्या अभिनयामुळे त्या लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचल्या. (Suchitra Bandekar Incident)
‘बाईपण भारी देवा’ हा सिनेमा सुपरहिट झाला आहेच. कित्येकदा सिनेमाविश्वात असं बोललं जात की, सुचित्रा बांदेकर ज्या चित्रपटात काम करतात तो सिनेमा सुपरहिट होतो, त्यामुळे त्यांना ‘लकीचार्म’ असं म्हटलं जातं. याबद्दल बोलताना अभिनेत्री सुचित्रा बांदेकर यांनी एका मुलाखतीत भाष्य केलं, त्या म्हणाल्या की, “मी देवाची लाडकी आहे. स्वामींचं माझ्यावर प्रेम आहे. म्हणून जे-जे चांगलं असतं, तेच माझ्या वाट्याला येतं.
का म्हणतात सुचित्रा बांदेकर यांना लकीचार्म? (Suchitra Bandekar Incident)

‘फुल थ्री धम्माल’, ‘मी शिवाजी राजे भोसले बोलतोय’, ‘सिंघम’, ‘सिम्बा’, ‘रणांगण’, ‘झिम्मा’, ‘बाईपण भारी देवा’ असे अनेक मोजके सिनेमे मी केले असून हे सगळे सिनेमे सुपरहिट झाले आहेत. माझा सुपरहिटचा रेकॉर्ड ९९ टक्के आहे, त्यामुळे मला सिनेसृष्टीत ‘लकीचार्म’ असं म्हणतात. आपण प्रामाणिकपणे काम करत राहायचं, प्रत्येक कलाकृती तिचं नशीब घेऊन जन्माला येते, असं मला वाटतं.”
भूमिकांबद्दल बोलताना सुचित्रा असंही म्हणाल्या की, “भूमिकांच्या निवडीबाबत मी थोडीशी हट्टी आहे, एक तर मी मैत्रीखातर काम करते किंवा भूमिकेची ताकद बघून काम स्वीकारते.”
‘बाईपण भारी देवा’ चित्रपटात अभिनेत्री सुचित्रा बांदेकर यांनी पल्लवी ही व्यक्तिरेखा साकारली होती. पल्लवी या पात्रामुळे त्या विशेष चर्चेत आल्या. त्यांच्यासोबत या चित्रपटात रोहिणी हट्टंगडी, सुकन्या मोने, शिल्पा नवलकर, वंदना गुप्ते, दीपा परब या कलाकारांना पाहणं ही रंजक ठरलं.