Govinda Wife Sunita Ahuja Reaction On Divorce : काही महिन्यांपासून गोविंदा आणि सुनीता अहुजा यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत चर्चा सुरु झाली होती. दोघांच्या घटस्फोटाच्या बातम्यांना उधाण आलेलं पाहायला मिळालं. गोविंदा आणि त्याची पत्नी सुनिता अहुजा त्यांच्या लग्नाच्या ३८ वर्षानंतर घटस्फोट घेणार असल्याचं समोर आलं आणि साऱ्यांना मोठा धक्का बसला. एका मराठी अभिनेत्रीसह गोविंदाचे अफेअर असल्याच समोर आल्याने त्याची पत्नी सुनीता यांनी गोविंदापासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला, अशी बातमी सर्वत्र पसरली. मात्र या घटस्फोटाबाबत गोविंदा किंवा सुनीताने अदयाप कोणतेही स्पष्टीकरण दिले नाही.
दरम्यान, अभिनेत्याच्या व्यवस्थापकाने त्याच्या घटस्फोटाची बातमी नाकारली आणि दोघांमध्ये असे काहीसे सुरु होते पण आता त्यांनी समजुतीने हा प्रश्न सोडवला असल्याचं सांगितलं. आता, नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात ‘इन्स्टंट बॉलिवूड’शी बोलताना सुनीता यांनी घटस्फोटाच्या अफवांवर प्रतिक्रिया दिली. जेव्हा सुनिता अहुजा यांना बनावट बातम्या किंवा अफवांबद्दल विचारले गेले तेव्हा सुनीता यांनी गमतीशीर उत्तर देत म्हटले की, “आता तू खूप बोलत आहेस”. त्या पुढे म्हणाल्या, “मला कोणत्याही बातमीचा फरक पडत नाही. जोपर्यंत तुम्ही आमच्या तोंडातून याबाबत काही ऐकत नाही तोपर्यंत विश्वास कोणत्याही बातमीवर प्रतिक्रिया देऊ नका”.
आणखी वाचा – अंतराळातून येऊन एक महिना उलटला तरीही सुनीता विल्यम्स यांची अशी परिस्थिती का?, कधी स्वतःला सांभाळणार?
रविवारी, गोविंदाची पत्नी सुनीताचा एक व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला. ज्यामध्ये पापाराजीने त्यांना विचारले, “सर कसे आहात?”, यावर सुनीता यांनी खाली पाहिले आणि कोणतीही प्रतिक्रिया न देता त्या निघून गेल्या. यापूर्वीही, सुनीताचा एक व्हिडीओ व्हायरल झाला, ज्यामध्ये पापराजींनी “अभिनेता कुठे आहे?”, असे विचारले. तेव्हा तिने उत्तर देत म्हटलं होतं की, “आम्हीही शोधत आहोत”.
आणखी वाचा – सुप्रसिद्ध अभिनेत्रीला बिग बींसमोरच ब्लाऊज काढण्यास सांगितलेलं अन्…; ‘तो’ धक्कादायक प्रकार पुन्हा समोर
एकीकडे, सुनीता यांच्या गोविंदाबाबत दिलेल्या प्रतिक्रिया आणि एकीकडे घटस्फोटाच्या बातम्यांचा फरक पडत नाही असे म्हणणे हे द्विधा मनस्थितीत अडकवणारे आहे. गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता अहुजा यांच्यात नेमकं काय सुरु आहे हा प्रश्न या साऱ्या हरकतींमुळे संभ्रमात पाडणारा आहे.