मराठी वेबसीरिजची ताकद आणि प्रेक्षकांमध्ये त्याप्रती असलेलं प्रेम याचा प्रत्यय ‘दहावी-अ’ या वेबसीरिजमुळे आला. ITSMAJJA च्या ‘आठवी-अ’ वेबसीरिजवर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केलं. प्रेक्षकांच्या प्रेमापोटी या सीरिजचा पुढचं सीझन प्रदर्शित करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचनुसार ‘दहावी-अ’चा प्रवास सुरु झाला. आता या वेबसीरिजवर प्रेक्षक जीवापाड प्रेम करत आहेत. प्रत्येक भागाला मिलियनच्या घरात व्ह्युज आहेत. या सीरिजमधील कलाकार तर घराघरांत पोहोचले आहेत. याच कलाकारांची मुंबई सफर सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. ‘दहावी-अ’ची मुलं सध्या जीवाची मुंबई करत आहेत. त्याचीच झलक आज आपण पाहणार आहोत. (dahavi a actors mumbai tour)
‘दहावी-अ’चे कलाकार सृष्टी, संयोगिता, अथर्व, ओम, श्रेयस, सत्यजीत, रुद्र सध्या मुंबईत धमाल करत आहेत. मुंबईत आल्यानंतर सर्वप्रथम त्यांनी सिद्धीविनायकचे दर्शन घेतलं. तिथे मुलांना पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी जमली. मुलांनी दर्शन घेत देव बाप्पाला डोळे भरुन पाहिलं. गावाकडे राहणारी ही मुलं पहिल्यांदात मुंबईला इतकं जवळून पाहत आहेत. तोच आनंद मुलांच्या चेहऱ्यावर ओसांडून वाहत आहे.
सिद्धिविनायकच्या चरणी नतमस्तक झाल्यानंतर मुलांनी बाप्पाच्या पेटिंग्स पाहिल्या. त्यानंतर सृष्टी, संयोगिता, अथर्व, ओम, श्रेयस, सत्यजीत, रुद्रच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा भाग होता तो वांद्रेची सफर. वांद्रे येथील समुद्रकिनारी गेल्यानंतर मुलांनी शाहरुख खानचा मन्नत बंगला पाहिला. फोटो काढले. त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. त्यांच्यासाठी सुरु असलेली ही मुंबई ट्रीप स्वप्नवत आहे.
आणखी वाचा – यंदा ‘बिग बॉस’, ‘खतरों के खिलाडी’ शोला टाळा, पण अचानक एवढा मोठा निर्णय का?, घडलं असं की…
रेडिओच्या विविध चॅनल्सला मुलांनी मुलाखती दिल्या. तिथेही सगळ्यांनी मिळून दंगा घातला. तसेच आपापले अनुभव सांगितले. रेडिओ चॅनलच्या मुलाखतींचा दिवस म्हणजे मुलांसाठी मोठा दिवस होता. मुंबईचं मुख्य आकर्षण असलेल्या राणीच्या बागेतही ‘दहावी-अ’चे कलाकार गेले. तिथे त्यांनी विविध प्राण्यांना जवळून पाहिलं. पेंग्विन, वाघ पाहून तर मुलं भारावून गेले. आता १३ एप्रिल ‘दहावी-अ’च्या कलाकारांसाठी महत्त्वाचा असणार आहे. यामागचं कारण म्हणजे मुंबई इंडियन्स. मुंबई इंडियन्सची मॅच सुरु असताना ही सगळी मंडळी स्टुडिओमध्ये उपस्थित असणार आहेत. १३ एप्रिल संध्याकाळी ६.३० वाजता MI च्या सोशल मीडिया चॅनलवर तुम्ही ‘दहावी-अ’च्या टीमला पाहू शकता.