रिएलिटी शोमध्ये दाखवण्यात आलेले प्रत्येक क्षण खरंच असतात का? याबाबत अनेक चर्चा रंगतात. परिक्षकांनी स्पर्धकाला दिलेली कमेंट, स्पर्धकांची दाखवलेली हळवी बाजू, काही भागांमध्ये दाखवलेलं भावनिक चित्र स्क्रिप्टेड असल्याचं दिसून येतं. इतकंच काय तर कलाक्षेत्रातील काही मंडळीही रिएलिटी शो स्क्रिप्टेड असल्याचं उघडपणे बोलतात. आता पुन्हा एकदा याच शोबाबत सुप्रसिद्ध गायक शानने भाष्य केलं आहे. शानने ‘द व्हॉइस इंडिया’, ‘सारेगमपा लिटील चॅम्प’ सारख्या शोचं जज म्हणून काम पाहिलं. पण या शोमधील सत्य कळाल्यानंतर त्याने स्वतःहून यापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. नक्की या शोमध्ये काय घडतं?, शानने एवढा मोठा निर्णय का घेतला? हे जाणून घेऊया. (singer shaan on reality show)
रिएलिटी शोमचं खरं सत्य
विक्की लालवानीच्या पॉडकास्टमध्ये शानने हजेरी लावली होती. यादरम्यान त्याने संपूर्ण सत्य परिस्थिती सांगितली. शान म्हणाला, “रिएलिटी शोमध्ये गायक जे स्टेजवर गातात ते एकदाच गातात. पण त्यानंतर त्यांच्या गाण्याचा ऑडिओ स्टुडिओमध्ये घेऊन जातात. स्टुडिओमध्ये पुन्हा त्या गायकांना गायला सांगितलं जातं. गेल्या काही वर्षांपासून हेच सुरु आहे. त्यानंतर पुन्हा एकदा एडीटमध्ये त्या गाण्यावर काम केलं जातं”.
आणखी वाचा – ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ मालिकेत स्मृती ईराणी यांचे कमबॅक, एकता कपूरकडून शिक्कामोर्तब, उत्सुकता वाढली
परीक्षकांच्या प्रतिक्रियाही स्क्रिप्टेड
रिएलिटी शोमध्ये गायक जे गाणं गातात ते प्रेक्षक म्हणून मनोरंजनात्मक वाटतं. पण त्यामागचं सत्य काही वेगळंच असतं. स्पर्धकाच्या एका गाण्यामध्ये इतकं एडिटींग असणं म्हणजे प्रेक्षकांची ही ती फसवणूकच आहे. शानने आणखी एका गोष्टीबाबत खुलेपणाने भाष्य केलं. रिएलिटी शोमधल्या परिक्षकांनाही काय बोलावं, स्पर्धकांबाबत त्यांची टिप्पणी याविषयी सांगितलं जातं. नेमकं हेच शानला खटकलं. खोटं वागणं त्याला जमलं नाही. एपिसोड संपूर्ण एडिट झाल्यानंतर परीक्षक स्पर्धकांबाबतची प्रतिक्रिया देतात.
आणखी वाचा – आयुष्मान खुरानाच्या पत्नीचा पुन्हा कॅन्सरचा लढा सुरु, आजाराबाबत मोठा खुलासा, म्हणाली, “खऱ्या नात्यांपेक्षा…”
रिएलिटी शोमध्ये जेव्हा स्पर्धकांना खरं दाखवलं जायचं तेव्हाच टीआरपी चांगला होता. असंही शानचं म्हणणं आहे. याचबाबत तो म्हणाला, “हे सगळं रिएलिटी शोमध्ये सुरु झालं तेव्हा जबरदस्ती करण्यात येत होती. मग मला त्यापासून त्रास होऊ लागला”. गेल्या काही वर्षांपासून रिएलिटी शोमध्ये शान दिसत नाही. त्याचा हा निर्णय मोठा होता. रिएलिटी शोचं हे चित्र म्हणजे प्रेक्षकांची फसवणूकच आहे.