Rekha Ignored Akshay Kumar : आजवरचा अक्षय कुमारचा इतिहास खूपच मनोरंजक आहे. आजही त्याच्या आयुष्यातील प्रकरणांवर चर्चा होत असते. अभिनेत्याचे लग्न ट्विंकल खन्ना हिच्याबरोबर झाले असून दोघेही दोन मुलांचे पालक आहेत. यापूर्वी अभिनेत्याचे नाव अनेक अभिनेत्रींनशी जोडले गेले असल्याचं पाहायला मिळालं. हे जोडले गेलेले नाव केवळ रवीना टंडनशी संबंधित नव्हते. तर शिल्पा शेट्टी आणि रेखा यांच्या बरोबरही प्रेमसंबंध असल्याच्या बातम्या आल्या. ब्रेकअपनंतर, अभिनेता त्याच्या एक्ससह दिसला. पण ३ मार्च रोजी जे घडले त्याने अनेकांना धक्का बसला. नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात मंचावर अक्षय कुमार आणि शिल्पा समोरासमोर आले आणि एकत्र थिरकले. तर रेखा यांनी अभिनेत्याकडे दुर्लक्ष केले.
अक्षय कुमार आणि रेखा यांच्या प्रकरणांच्या कथा खूप प्रसिद्ध आहेत. मुंबईत 3 मार्च रोजी झालेल्या कार्यक्रमाचा व्हिडीओ समोर आला आहे. जिथे अक्षय कुमारसुद्धा क्रिकेटपटू शिखर धवन यांच्यासमवेत स्टेजवर येतो. अभिनेता पुढे आहे आणि क्रिकेटपटू मागे उभा आहे, परंतु रेखा अक्षयकडे दुर्लक्ष करते आणि शिखरकडे पाहत त्याला हात जोडून नमस्कार करते. त्याच वेळी, अक्षय देखील समजतो आणि तो त्याच्या मागून दुसर्या बाजूला सरकतो.
आणखी वाचा – “औरंगजेब उत्तम प्रशासक” म्हणणाऱ्या अबू आझमींना हत्तीच्या पायदळी तुडवण्याची गरज?
या व्यतिरिक्त अभिषेक बच्चनसुद्धा स्टेजवर येतो तेव्हा रेखा त्याच्याजवळ जात त्याला घट्ट अशी मिठी मारते आणि अक्षय दूर उभा राहून दोघांकडे पहात राहतो. पण रेखा अक्षयला थोडा भाव न देता अभिषेकबरोबर चर्चा करु लागते. हे पाहून लोकांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. एका नेटकाऱ्याने लिहिले आहे की, “रेखा इतक्या कठोरपणे दुर्लक्ष करते, मग हे त्यांचं प्रेमप्रकरण किती वाईट पद्धतीने तुटलं असेल”. तर एकाने लिहिले आहे की, “अक्षय कुमारसाठी खूप विचित्र क्षण”. एकाने लिहिले, “अमिताभ बच्चन आता अभिषेककडून आयुष्यासाठी कर्ज घेत आहे”. एकाने लिहिले, “जया बच्चन आपल्या मुलाला घरी परत येण्यास सांगत आहे”. तर आणखी एकाने लिहिलेय, “हे सर्व ठीक आहे पण रेखाने अक्षयकडे दुर्लक्ष का केले?”.
आणखी वाचा – अरमान मलिकच्या दोन वर्षीय मुलाला गंभीर आजार, बायकोचे रडून हाल, परिस्थिती अशी की…
१९९६ मध्ये अक्षय आणि रेखा यांच्या प्रेमप्रकरणाची बातमी फुटली तेव्हा रवीना टंडनने सिने ब्लिट्डला दिलेल्या मुलाखतीत भाष्य केलं. “मला असे वाटत नाही की अक्षय आणि रेखा यांच्यात काही संबंध होते. सत्य हे आहे की तो तिच्यापासून दूर पाळायचा. चित्रपटामुळे अक्षयने रेखाला सहन केले. एकवेळेस तर तिला घरुन जेवणाचा डब्बा हवा होता. पण मी यासाठी नकार दिला. मला वाटले की या गोष्टी विनाकारण पुढे जातील”.