Genelia Deshmukh On Chhaava Movie : अभिनेता विकी कौशलच्या ‘छावा’ या चित्रपटाची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरु आहे. अल्पावधीतच या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. प्रदर्शनाच्या अगदी पहिल्याच आठवड्यात या चित्रपटाने तब्बल २०० कोटींचा आकडा पार केला. ‘छावा’ने बॉक्स ऑफिसवर ग्रँड ओपनिंग करत बक्कळ कमाई केली आहे. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित छावा चित्रपटाची सर्वत्र चर्चा सुरु असून या चित्रपटात काम केलेल्या कलाकारांच्या अभिनयाचंही जोरदार कौतुक होत आहे.‘छावा’ सिनेमात विकीसह रश्मिका मंदाना, आशुतोष राणा, डायना पेंटी, अक्षय खन्ना, विनीत सिंह, प्रदीप रावत, संतोष जुवेकर, नीलकांची पाटेकर ही कलाकार मंडळी महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत.
सर्वसामान्यांबरोबरच अनेक कलाकार मंडळी ‘छावा’ सिनेमा पाहून चित्रपटाचं कौतुक करत आहेत. आलिया भट्ट, करण जोहर, आयुष्मान खुराना, राजकुमार राव या कलाकारांनी विकीसाठी खास पोस्ट लिहित त्याचं कौतुक केलं. या पाठोपाठ आता रितेश देशमुख यांची पत्नी जिनिलिया देशमुख ‘छावा’ चित्रपट भावुक झालेली पाहायला मिळाली. यावेळी तिने विकी कौशलसाठी खास पोस्ट स्टोरीला शेअरही केली. यावेळी अभिनेत्रीने विकी कौशलच्या मेहनतीचं, अभिनयाचं भरभरुन कौतुक केलं.
आणखी वाचा – सचेत-परंपराने ठेवलं लेकाचं नाव, अर्थ आहे फारच वेगळा, सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव

जिनिलियाने स्टोरीला पोस्ट शेअर करत असं म्हटलं की, “प्रेक्षकांसाठी असे काही कलाकार असतात ज्यांच्याकडून नेहमी आपल्याला सकारात्मक अपेक्षा असते की, हे काहीतरी चांगलंच करणार, विकी कौशल माझ्यासाठी तसा अभिनेता आहे. त्याची मेहनत, जिद्द, प्रामाणिकपणा खूप काही सांगून जातो. ऑनस्क्रीनवर विकी ज्याप्रकारे भूमिका साकारतो, यात त्याने घेतलेली मेहनत दिसून येते. खूप अभिनंदन विकी कौशल, रश्मिका मंदाना, मॅडडॉक फिल्म्स, लक्ष्मण उतेकर, अक्षय खन्ना आणि या चित्रपटाच्या संपूर्ण टीमचं खूप अभिनंदन! तुम्हाला सर्वांना खूप खूप प्रेम”.
जिनिलीयाची ही पोस्ट विकी कौशलने स्वत:च्या अकाऊंटवर रिशेअर करत, “जिनिलीया तू लिहिलेल्या अभिप्रायासाठी तुझे खूप खूप आभार” असं म्हटलं आहे. आता लवकरच अभिनेता रितेश देशमुख सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यगाथेवर आधारित एक नवीन ऐतिहासिक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहे. ‘राजा शिवाजी’ असं या सिनेमाचं नाव असून सध्या या चित्रपटाचं शूटिंग सुरू आहे.