Udit Narayan Troll : लाइव्ह शोचा व्हिडीओ समोर आल्यानंतर बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक उदित नारायण यांच्यावर सोशल मीडियावर बरीच टीका झाली. उदित नारायणने अलीकडेच स्टेजजवळ उभे असलेल्या एका चाहतीला किस केले ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. या व्हिडीओमध्ये, लोकांनी महिला चाहतीला किस केल्यावर जोरदार टीका केली. अलीकडेच उदित नारायण ‘द रोशन्स’ या डॉक्युमेंटरी मालिकेच्या सक्सेस पार्टीला उपस्थित राहिले. त्यावेळी ते पापाराझींना पोज देताना दिसले तेव्हा पापाराझीने त्यांच्याशी विनोद केला आणि त्यापैकी एकाने विचारले, “सर, एक किस मिळेल का?”. पापाराझींचा हा संवाद ऐकताच गायक उदित नारायण हसले आणि तिथून निघून गेले.
पापाराझींबरोबरच्या संवादाचा हा व्हिडीओ समोर येताच लोकांनी या व्हिडीओवर कमेंट करण्यास सुरवात केली आहे. एका वापरकर्त्याने सांगितले, “जोपर्यंत उदितजी पापराजींची इच्छा पूर्ण करत नाहीत तोपर्यंत हा खेळ सुरुच राहणार”. तर दुसऱ्या नेटकऱ्याने म्हटलं, “मागे उभ्या असलेल्या बाईची स्थिती पहा, ती अचानकपणे हल्ला तर करत नाही ना यामुळे अस्वस्थ दिसत आहे”.
आणखी वाचा – राधिका आपटेने हॉटेलच्या बाथरुममध्ये जाऊन केलं ब्रेस्ट पंपिंग, शेअर केला फोटो, नेटकऱ्यांनी सुनावलं कारण…
उदित नारायण लाइव्ह शोमध्ये ‘टीप टीप बरसा पाणी’ हे गाणं सादर करत होते त्यावेळी ही घटना घडली. एक महिला चाहती त्यांच्याबरोबर सेल्फी घेण्यासाठी स्टेजवर आली. तेव्हा एका महिला चाहतीने मागे वळून त्यांच्या गालावर किस केले. यानंतर, गायकानेही त्या महिलेच्या ओठांवर किस केले. यानंतर, दुसर्या एका महिला चाहतीने सेल्फी घेण्यासाठी उदित यांना गाठले, त्यानंतर गायकाने तिच्या गालावरही किस केले. आता उदित नारायण यांचा लाईव्ह परफॉर्मन्सदरम्यान महिला चाहतीला किस घेण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
‘एचटी सिटी’शी बोलताना उदित नारायण म्हणाले, “चाहते खूप वेडे आहेत. आम्ही सुसंस्कृत लोक आहोत. काही लोक त्यास प्रोत्साहित करतात आणि त्याद्वारे त्यांचे प्रेम व्यक्त करतात. आता काय करावे”. उदित नारायण पुढे म्हणाले, “गर्दीत बरेच लोक असतात आणि आमचे अंगरक्षकही उपस्थित असतात. परंतू चाहत्यांना असे वाटते की, त्यांना भेटण्याची संधी मिळत आहे, म्हणून कोणीतरी हात मिळवण्यासाठी, कोणीतरी हातावर किस करण्यासाठी येतात. त्यामुळे याकडे इतके लक्ष देऊ नका”.