Sapna Choudhary on Third Child : हरियानवी अभिनेत्री सपना चौधरी तिचे वैयक्तिक आयुष्य नेहमीच खासगी ठेवते. सपनाने वीर साहूशी लग्न केले आहे. तर अभिनेत्रीने तिचे हे लग्नही गुप्त ठेवले. इतकंच नाही तर सपनाने तिची गर्भधारणाही लपविली होती. सपना आता दोन मुलांची आई आहे. यानंतर आता सपना चौधरीला तिसरे मूल हवे आहे. भारती सिंगच्या पॉडकास्टमध्ये सपना तिच्या तिसर्या मुलाबद्दल बोलली. हा व्हिडीओ सपनाला दुसरं मूल झालेलं नसतानाचा आहे. भारती सिंगच्या पॉडकास्टमध्ये आजवर अनेक कलाकारांनी हजेरी लावत वैयक्तिक आयुष्याबाबतचे अनेक खुलासे आहेत. यांत आता हरियानवी अभिनेत्री सपना चौधरीने भर घालत तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत केलेलं भाष्य लक्षवेधी ठरतंय.
भारतीने सपनाला तिच्या शोमध्ये विचारले की, “ती दुसऱ्या बाळाला जन्म देणार का?”. यावर, सपना म्हणाली, “मी. हो करेन. नवरा-बायको आहोत मुलं जन्माला तर येणारच ना. मला तीन मुले असावीत अशी माझी इच्छा आहे. मला असे वाटते की आपली संस्कृती पुढे जात आहे तसतसे संबंध फारसे जगणार नाहीत. ज्यांचं तुम्ही पालन पोषण करु शकता एवढ्या मुलांना जन्म द्या. मुलांना सगळ्या नात्यांची आवश्यकता असते”. सपनाने २०२० मध्ये वॉर साहूशी लग्न केले. जेव्हा सपनाला पहिले मूल झाले तेव्हा तिच्या लग्नाचा खुलासा झाला. सपनाला दोन मुलं आहेत. सपनाने आपल्या मुलांचे नाव पोरस आणि शाह वीर असे ठेवले आहे.
आणखी वाचा – Video : “एक किस करा एक किस…”, उदित नारायण कॅमेऱ्यासमोर येताच जोरजोरात ओरडू लागले पापाराझी, व्हिडीओ व्हायरल
सपना एक लोकप्रिय नर्तक आहे. तिच्या नृत्य शैलीने तिने आजवर अनेकांना वेड केलं आहे. सपना चौधरीचे ‘तेरी आँखों का ये काजल’ हे गाणे खूप व्हायरल आहे. ‘बिग बॉस ११’ मध्ये सपना चौधरी दिसली होती. या शोमध्ये सपनाने धुमाकूळ घालत रसिकांच्या मनावर राज्य केलं. या शोमधून बाहेर पडल्यानंतर, सपनाचे जबरदस्त परिवर्तन दिसून आले. सपनाने तिचे वजन कमी केले आणि फॅशन स्टेटमेंट पूर्णपणे बदलले.