काही दिवसांपूर्वीच अभिनेते किरण माने यांनी शरद पोंक्षे यांच्या लेकीसाठी लिहिलेले पोस्ट विशेष चर्चेत होती. बरं नाव न घेता लिहिलेली ही पोस्ट चांगलीच वादाच्या भोवऱ्यात अडकली. या पोस्टमागोमाग किरण माने यांनी एक भली मोठी पोस्ट शेअर केली आहे. ‘श्री तशी सौ’ या नाटकाला बारा वर्ष पूर्ण झाल्याने किरण माने यांनी एक खास पोस्ट वंदना गुप्ते यांच्यासाठी लिहिली. वंदना गुप्तेंबरोबरचे काही फोटो सोबत त्यांनी एक पोस्ट देखील केली आहे. (Kiran mane post for Vandana Gupte)

किरण माने यांनी लिहिलेल्या या पोस्ट मध्ये त्यांनी लिहिलं आहे की, “…काॅलेजमध्ये असताना जिचा मी ‘फॅन’ होतो.. जिच्यावर अक्षरश: ‘क्रश’ होता.. जिच्या आवाजाचा मी दिवाना होतो.. पुढं जाऊन त्याच अभिनेत्रीचा मी हिरो म्हणून प्रमुख भुमिका करणारंय, असं कुणी सांगीतलं असतं, तर मी त्याला येड्यात काढलं असतं ! रिहर्सल करताना स्वत:वर विश्वासच बसत नव्हता…’चारचौघी’मधल्या तिच्या ‘फोन सीन’साठी कितीतरी वेळा ते नाटक पाहिलंवतं मी. ज्याचा त्याचा प्रश्न-संध्याछाया-सेलिब्रेशन.. प्रत्येक नाटक फक्त तिच्यासाठी पाहिलं.. ‘कट टू’ – तिच्या शेजारी उभा राहून मी लव्ह सीन करत होतो, गाणी म्हणत होतो. आईशप्पत ! विश्वासच बसत नव्हता स्वत:वर…”
पाहा वंदना गुप्ते यांच्यासाठी किरण माने काय म्हणाले (Kiran mane post for Vandana Gupte)
सुपरस्टार प्रशांत दामले यांच्या ‘श्री व सौ’ या नाटकामध्ये ‘श्रीं’ची भूमिका करण्यासाठी किरण यांना विचारण्यात आलं तेव्हा त्यांना काही सुचेनासं झालं. वंदना गुप्ते यांच्यासोबत काम करणार हे ऐकल्यावर त्यांना घामच फुटला. अगदी पहिल्या प्रयोगावेळी त्यांना खूप टेन्शन आलं होत. मात्र पहिला प्रयोग दणक्यात पार पडला आणि इंग्लंड,लंडन-हाॅन्सलो-इलफर्ड-बर्मिंगहॅम पासून थेट स्काॅटलंड पर्यंत या नाटकाचे प्रयोग हाऊसफुल्ल झाले.
हे देखील वाचा – दिग्दर्शक करण जोहरने केलं अभिनेत्री क्षिती जोगचं कौतुक म्हणाला, “मला ठाऊक होत की….”

वंदना गुप्ते यांचा खूप मोठा चाहता म्हणत किरण माने यांनी केलेली पोस्ट सध्या चर्चेत आहे. वंदना गुप्ते या सध्या ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. या चित्रपटातील त्यांच्या शशी या पात्रामुळे त्यांना विशेष लोकप्रियता मिळाली. चित्रपटातील त्यांच्या भूमिकेचे प्रचंड कौतुक केलं जात आहे. सध्या हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करताना दिसत आहे.