हिंदी टीव्हीविश्वातील अभिनेत्री व सध्या अध्यात्माकडे वळालेली अभिनेत्री नुपूर अलंकार ही नुकतीच केदारनाथ येथे अडकली होती. मात्र तिची आता हेलिकॉप्टरने सुटका करण्यात आली. नूपुर अलंकार नुकतीच केदारनाथचे दर्शन घेण्यासाठी गेली होती, पण तिथे दरड कोसळ्यामुळे ती त्याठिकाणीच अडकली. अभिनेत्रीने सोशल मीडियावर याबाबतची माहिती देताना तिथल्या रेस्क्यूचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. (actress nupur alankar rescued in kedarnath)
व्हायरल झालेल्या व्हिडिओनुसार अभिनेत्री नुपूर अलंकार ही केदारनाथच्या दर्शनासाठी गेली होती. पण दर्शन घेऊन परतताना सलग पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे तिथे दरड कोसळली आणि तिच्यासह काही जण अडकले. तिथे तब्बल दोन तास अडकली होती. त्यानंतर मदतीला तेथील कर्मचारी आलेत, अन अभिनेत्री व अन्य लोकांची हेलिकॉप्टरने सुटका करण्यात आली. एक डिग्री तापमानात असून आपण देवाच्या कृपेने ती वाचल्याचे तिने या व्हिडिओत सांगितले.
पहा हा व्हिडिओ (actress nupur alankar rescued in kedarnath)
अभिनेत्री नुपूर अलंकारने शक्तिमान, घर की लक्ष्मी बेटियां, दिया और बाती या प्रसिद्ध मालिकांसोबत १५० पेक्षा जास्त टीव्ही शोजमध्ये काम केलंय. जवळपास २७ वर्षे टीव्ही आणि फिल्म इंडस्ट्रीत काम केल्यानंतर अभिनेत्रीने २०२२ मध्ये सर्व काही सोडून अध्यात्माकडे वळाली. लोकांना मदत करण्यासाठी आपण संन्यास घेतल्याचं नुपूरने तिच्या चाहत्यांना सांगितलं होतं. आता ती फक्त देवाच्या भक्तीत मग्न असून देशभरातील मंदिरांमध्ये जाऊन दर्शन घेते आणि आशीर्वाद घेते. (tv actress nupur alankar)
हे देखील वाचा : ‘यूफोरिया’ या लोकप्रिय सिरीज मधील २५ वर्षीय अभिनेता एंगस क्लाउडचा दुर्दैवी मृत्यू