रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

गावात भूत येणार अन् मुलांची तारांबळ…; ‘दहावी-अ’ नव्या वळणावर, पुढील भागात नक्की काय होणार?

Saurabh Moreby Saurabh More
फेब्रुवारी 2, 2025 | 2:30 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Dahavi-A Series daily updates

गावात भूत येऊन मुलांची तारांबळ, 'दहावी-अ'च्या पुढील भागात काय होणार?

‘इट्स मज्जा’च्या नवीन ‘दहावी-अ’ या वेब सीरिजला आतापर्यंत भरभरून प्रतिसाद मिळत आहे. दिवसेंदिवस या सीरिजची लोकप्रियता वाढत असून सीरिजमध्ये पुढे काय होणार? ही उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिलेली असते. आतापर्यंत या सीरिजचे एकूण आठ भाग प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. शाळेचे नुकसान केलेल्या मुलांना पुन्हा एकदा शाळेत यायची संधी मिळाली आहे. त्यांनी मेहनत घेत शाळेचे नुकसान भरुन काढले आणि त्यांना शाळेत प्रवेश मिळाला. नुकत्याच झालेल्या भागात रेश्मा व केवडा यांच्यात गैरसमज झालेले पाहायला मिळाले. शिवाय शिंदे सरांच्या क्लास येण्यासाठी अधिकचे पैसे नसल्यामुळे आभ्या येऊ शकणार नाही. ही समजताच केवडा नाराजही झाली होती. (Dahavi-A Series daily updates)

अशातच गेल्या भागात शाळेत नाटकाची नोटीस आली असून यात सर्वांनी सहभाग घेतला आणि यावेळी केवडा आभ्याची नाटकातली बायको बनली होती. या नाटकाच्या प्रयोगासाठी सगळी मुलं तालुक्यात गेली होती. तसंच सुरुवातीला साशंक असलेल्या मुलांनी नाटकाचे उत्तम सादरीकरण केले आणि पारितोषिकही मिळवलं. सागऱ्या व मध्या यांच्यात थोडी भांडणंही झाली. पण कांबळे सरांनी मुलांना एकतेचे महत्त्व पटवून दिले आणि इथे तुम्ही शाळेचे प्रतिनिधित्व करत आहात. त्यामुळे नीट वागण्याचा सल्लाही दिला.

आणखी वाचा – दिवंगत रोहित बल यांच्या आठवणीत सोनम कपूरला कोसळलं रडू, ‘ओव्हरअ‍ॅक्टींग’ म्हणत नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, व्हिडीओ व्हायरल  

नाटक संपल्यानंतर घरी येताच केवडाने आभ्या, मध्या, रेश्मा यांच्या गावडी जाण्याचा हट्ट धरला. यावेळी कांबळे सरांनीही तिचं ऐकत तिला आभ्या, मध्या, रेश्मा यांच्या गावी आणले. यामुळे आभ्या खूपच खुश होता. तर तिच्याबरोबर ज्योतीही आल्यामुळे मध्यालाही आनंद झाला होता. यावेळी आभ्याकी आई तिला रात्रभर घरी राहण्याविषयी सुचवते. मात्र रेश्मा यावर केवडाची आई वाट बघत असेल असं म्हणत तो विषय टाळते. पुढे दाद्या व आई मध्याचे पारितोषिक मिळाल्यानिमित्त कौतूक करतात.

आणखी वाचा – सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याला युट्यूबकडून मिळालं सिल्व्हर प्ले बटण, भावुक होत म्हणाला, “पप्पांची दोन वेळच्या जेवणासाठी मेहनत आणि…”

अशातच आता पुढील भागात गावात भूत येणार असल्याचे पाहायला मिळणार आहे. गावातील स्त्रिया भुताविषयी बोलतानाचे मुलं ऐकणार आहेत आणि यामुळे आभ्या, किरण्या, विक्या आणि मध्या यांची चांगलीच तारांबळ उडणार आहे. त्यामुळे आता यातून ही मुलं कसा मार्ग काढणार? आणि पुढील भागात नक्की काय होणार? हे बघण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.   

Tags: Dahavi-A Series daily updatesItsmajja Dahavi-A SeriesItsmajja Dahavi-A Series News
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Mamta Kulkarni on Mahamandeleshwar allegations

१० कोटी रुपये देऊन महामंडलेश्वर बनल्याच्या आरोपांवर ममता कुलकर्णींचे भाष्य, म्हणाल्या, "माझ्या खात्यात..."

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.