मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार मंडळी अनेकदा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात अनेक कठीण प्रसंगांना सामोरे जात असतात. याबद्दल ते सोशल मीडियाद्वारे आपल्या चाहत्यांपर्यंत माहिती पोहोचवत असतात आणि याद्वारे ते चाहत्यांना सावधदेखील करत असतात. असंच काहीसे झाले होते एका सुप्रसिद्ध अभिनेत्याबरोबर आणि हा अभिनेता म्हणजे लग्नाची बेडी मालिकेतून घराघरांत पोहोचलेला सुप्रित कदम. सुप्रितने आपल्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यातून त्याने त्याचा पुन्हा पुनर्जन्म झाल्याचे सांगितलं आहे. अभिनेत्याला वर्षभरापूर्वी ब्रेन स्ट्रोक आला होता आणि मग त्यानंतर पॅरालिसिसचा झटका. यावर डॉक्टरांनीदेखील त्याच्या जगणबद्दल आशा सोडली होती. मात्र अभिनेत्याने या आजारांचा सामना केला आहे. (Lagnachi Bedi fame Actor Suprit Kadam on his medical condition)
सुप्रितने त्याच्या सोशल मीडियावर याबद्दलचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे, यासह त्याने असं म्हटलं आहे की, “दिवसा मागून दिवस गेले आणि आज त्या गोष्टीला वर्ष झालं. हे वर्ष खूप म्हणजे खूप काही शिकवून गेलं. खूप गोष्टींचे महत्व शिकवून गेले. कारण मागच्या वर्षी याच दिवशी मला ब्रेन स्ट्रोक येऊन पॅरलिसिस अटॅक आला होता. काही वेळा साठी डॉक्टरने सुध्दा गेरेंटी सोडली होती. भावाचे रडून हाल. जीवन मरणाच्या दारात असताना एक वाटत होतं की, मला माझ्या मित्रांना खूप काही सांगायचे आहे. त्यांच्याशी खूप बोलायचं आहे. हसायचं आहे. मजा कराची आहे. माझ्या बायकोची काही स्वप्न आहेत, ती पूर्ण करायची आहे. वीराला शाळेत जाताना बघायचे आहे. माझं एवढच आयुष्य होतं.”
आणखी वाचा – राखी सावंतच्या तुटलेल्या तिसऱ्या लग्नावर पूर्वाश्रमीच्या पतीने उडवली खिल्ली, म्हणाला, “पाकिस्तानची सून…”
यापुढे त्याने असं म्हटलं आहे की, “पण ते म्हणतात ना आपण कुठेतरी चांगली काम करतो ती कामी येतात. तसंच काहीस झालं. देव माझ्याबरोबर होता. पण देवाला प्रत्येक ठिकाणी मला मदत करणं शक्य नाही म्हणून त्यांनी काही माणसं माझ्या आयुष्यात नेमून दिली. मला दुसरे जीवन देणारे माझे मित्र. शुद्धीत आलो तेव्हा सगळे सामोर उभे होते अगदी देवासारखे. वाटलं नव्हतं साले देवाच्या रूपात माझ्या समोर येतील. आयुष्यात जी काही भांडण झाली, जे काही गैरसमज झाले ते सगळं विसरून माझ्याबरोबर उभे होते”.
आणखी वाचा – Shiva Serial : शिवा-आशु अडकले लग्नबंधनात, आईच्या विरोधात जात एकमेकांची निवड, प्रेमाची कबुलीही दिली अन्…
यापुढे अभिनेत्याने असं म्हटलं आहे की, ‘या सगळ्यात एक गोष्ट प्रकर्षाने सांगू इच्छीतो की, गैरसमज, राग, रुसवे, दुश्मनी हे सगळं माणूस जिवंत असेपर्यंत… एकदा तो निघून गेला की, राहतो तो पश्चाताप. तुम्हाला कोणाची माफी मागायची असेल?, कोणाला माफ करायच असेल?, तर करुन टाका. कारण दुसऱ्या क्षणाला ती व्यक्ती असेल की नसेल माहित नाही. हात जोडून मनापासून आभार जे माझ्याबरोबर उभे होते”