कोणत्याही क्षेत्रात काम करत असताना अनेकदा स्त्रियांना वाईट अनुभवांना सामोरे जावे लागते. मात्र या कठीण काळात त्या त्यांच्यावर आलेल्या एखाद्या कठीण परिस्थितीचा सामना कसा करतात ही देखील तितकंच महत्त्वाचे असते. आपल्यावर ओढावलेल्या कठीण काळात खचुन न जाता त्या परिस्थितीला धीराने तोंड देणं यातूनच स्त्रीशक्ती दिसून येते. असंच एका मराठी अभिनेत्रीने तिच्यावर ओढावलेल्या कठीण काळाबद्दल सांगितले आहे आणि या कठीण काळाचा धीराने कसा सांभाळ केला हेही सांगितले आहे. ही अभिनेत्री म्हणजे माधुरी पवार. ‘आरपार’ला दिलेल्या मुलाखतीत तिने शाळेत असताना तिच्यावर ओढावलेल्या कठीण काळाबद्दल सांगितलं आहे. (madhuri pawar school incident)
याबद्दल बोलताना माधुरीने असं सांगितलं की, “मी शाळेत आठवी-नववीला होते. मी तेव्हा खूप स्पर्धा करायचे. कधी कधी काय होतं आपल्या बाजूला अनेक माणसं असतात. तेव्हा आपल्याला असं वाटत असतं की हा आपला मित्र आहे, हा आपला सखा आहे. पण त्याच्या आतमधला माणूस आपल्याला माहीत नसतो. आपण अंतर्यामी नाही. एकदा कोल्हापूरच्या पुढे कागलला एका स्पर्धेनिमित्त गेलो होतो. तेव्हा आई-बाबांना वेळ नव्हता. तर एक व्यक्ती आहे, मी आता त्याचं नाव नाही घेणार कारण त्याचा चांगला संसार सुरू आहे. तोही स्पर्धेत परफॉर्मन्स करायचा. तर त्याने मला सांगितलं आपण दोघे पुढे जाऊया आणि मलाही तेव्हा असा काही फरक वाटला नाही. मी टॉमबॉईश होते. आई-बाबाही म्हणाले की ओळखीचाच आहे तर जा आणि बाकीचा ग्रुप मागून येणार होता”.
आणखी वाचा – The Family Man 3 मध्ये मनोज वाजपेयी व जयदीप अहलावत यांच्यात रंगणार चुरस, कहाणी आणखी रोमांचक होणार
यापुढे तिने सांगितले की, “त्यानेच आग्रह केला की आपण पुढे जाऊ आणि लवकर पोहोचू. मग आम्ही गेलो. तर तिथे गेल्यानंतर आवरण्यासाठी एक रुम दिली होती. बसल्यानंतर एक मुलगी म्हणून काही गोष्टी कळतात, कारण तो सेन्स देवाने दिलेला असतो. तेव्हा मी शाळेत होते पण मी तेव्हा ती गोष्ट इतक्या सहजरीत्या हाताळली. तो व्यक्ती माझ्या जवळ येऊन बसला आणि त्याने माझ्या खांद्यावर हात ठेवताच मी त्याला बोलले की, “हा हात माझ्या खांद्यावर असला की, मला खूप छान वाटतं. मला खूप चांगलं वाटतं की, एक चांगला मनुष्य माझ्याबरोबर आहे. मला खूप भारी वाटतं की तू माझा मित्र आहेस”. मग त्या व्यक्तीच्याही मनात आलं असेल की, यार आपण हिच्याबद्दल खूप वाईट विचार करतोय पण ही किती चांगला विचार करत आहे”.
पुढे माधुरी असं म्हणाली की, “व्यक्ती कितीही वाईट असला तरी त्याच्या मनात विश्वास जागृत केला तर तो माणूस चांगलंच करणार. जर मी तेव्हा त्याच्या मनात तो विश्वास जागृत केला नसता तर काहीही झालं असतं आणि कदाचित मला घरी सांगताही आलं नसतं आणि मी एक मुलगी म्हणून ते कधीच विसरु शकले नसते”.