रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

अभिनेत्री ममता कुलकर्णींनी अध्यात्माचा मार्ग का निवडला?, किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वरची मिळाली पदवी कारण…; सांगितलं सत्य

Shamal Sawantby Shamal Sawant
जानेवारी 25, 2025 | 3:11 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
mamta kulkarni sanyasi

अध्यात्माचा मार्ग निवडण्यामागील सांगितलं काराण

बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री ममता कुलकर्णी सध्या खूप चर्चेत आहेत. २००२ साली ती ‘कभी हम कभी तुम’ या चित्रपटानंतर त्यांनी चित्रपटसृष्टीला राम राम केला. त्यानंतर त्यांनी भारत सोडला आणि त्या केनियाला शिफ्ट झाल्या. आता त्या तब्बल २४ वर्षांनी भारतात परतल्या. मात्र सध्या त्या कोणत्याही चित्रपटामुळे किंवा अभिनयामुळे नाही तर एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आल्या आहेत. ममता प्रयागराज येथे आयोजित करण्यात आलेल्या महाकुंभ मेळ्यात सहभागी झाल्या होत्या. यावेळी त्यांनी संन्यास घेण्याचा निर्णय घेतला. ममता यांनी संन्यास घेतल्याची दीक्षा घेतली. ममता यांनी प्रयागराज महाकुंभात संन्यासाची दीक्षा घेतली असून आता त्यांना किन्नर आखाड्यात महामंडलेश्वर ही पदवी देण्यात आली आहे. (mamta kulkarni sanyasi)

ममता यांनी आध्यात्मिक यात्रा व किन्नर आखाड्याची पदवी मिळाल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या की, “मला महाशक्तींनी याची निवड करण्याचे आदेश दिले. गेले २३ वर्ष मी ध्यान करत आहे. माझी खूप परीक्षा घेतली गेली आणि प्रत्येक परिक्षेमध्ये मी पास झाले. तेव्हा जाऊन मला महामंडलेश्वर उपाधी मिळाली आहे.

आणखी वाचा – “मराठी अभिनेत्याने महाराजांची भूमिका करायला हवी होती”, ‘छावा’चा ट्रेलर पाहिल्यानंतर मराठी अभिनेत्याची खंत, म्हणाला, “कुठेतरी कमी आहोत…”

View this post on Instagram

A post shared by Mamta Kulkarni 🔵 (@mamtakulkarniofficial____)

त्यानंतर ममता यांना ‘श्री यमाई ममता नंद गिरी’ हे नाव दिले गेले. महामंडलेश्वर दशनामी संप्रदायातील हिंदु भिक्षूंसाठी एक विशेष उपाधी आहे. यातील प्रमुख व्यक्ती सनातन धर्माचा प्रसार करतात. किन्नर आखाड्याची स्थापना २०१५ साली करण्यात आली होती. ही तृतीयपंथी लोकांना अध्यात्मिक क्षेत्रात समाविष्ट करण्यासाठी समर्पित करण्यात येते. यावेळी लक्ष्मी नारायण मूर्ती यांनी ममता यांना महामंडलेश्वर म्हणून नियुक्त केल्याबद्दल भाष्य केले आहे. त्या म्हणाल्या की, “किन्नर आखाडा ममता कुलकर्णी यांना महामंडलेश्वर ही उपाधी देण्यात आली आहे. त्यांचे नाव आता श्री यामाई ममता नंदगिरी ठेवण्यात आले आहे. गेल्या दीड वर्षांपासून त्या किन्नर आखाडा व माझ्या संपर्कात आहेत”.

आणखी वाचा – विवियन डिसेनाच्या पार्टीमध्ये करणवीर मेहरा का नव्हता?, कारण विचारताच अभिनेत्याचे दुर्लक्ष, दोघांमध्ये मोठा वाद

पुढे त्या म्हणाल्या की, “जर त्यांची इच्छा असेल तर त्या कोणतेही आध्यात्मिक पात्र साकारु शकतात. आम्ही कोणलाही कला प्रदर्शन करण्यापासून रोखत नाही”.  ममता यांनी १९९२ साली ‘तिरंगा’ या सुपरहिट चित्रपटातून आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली. त्यांनी आजवर जवळपास ४० बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे. ‘आशिक आवारा’, ‘करण अर्जुन’, ‘वक्त हमारा’ है आणि ‘क्रांतिवीर’ यांसारख्या अनेक चित्रपटांतून तिने आपल्या चाहत्यांच्या मनावर राज्य केले. २००१ मध्ये रिलीज झालेला ‘छुपा रुस्तम’ हा त्यांचा शेवटचा हिट चित्रपट होता.   

Tags: bollywood actressMamta Kulkarnisanyasi
Shamal Sawant

Shamal Sawant

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Saif Ali Khan attacker fingerprints taken by the police

सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीच्या बोटांचे ठसे जुळले नाहीत, तपासात मोठा खुलासा

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.