टेलिव्हिजनवरील कलर्स वाहिनीवर ‘लाफ्टर शेफ’च्या पहिल्या पर्वाने प्रेक्षकांची चांगलीच लोकप्रियता मिळवली आहे. या पर्वातील सगळेच कलाकर तसेच त्यांची धमाल मस्ती यांची खूप चर्चा रंगली. आता या कार्यक्रमाचे दुसरे पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या कार्यक्रमाचे अनेक प्रोमो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. यामध्ये रुबिना दिलैक, एलविश यादव, अब्दु रजाक, विकी जैन, अंकित लोखंडे, सुदेश लेहरी, राहुल वैद्य, मन्नारा चोप्रा, कश्मिरा शाह व कृष्णा अभिषेक असे अनेक दिग्गज कलाकार दिसून येणार आहेत. पहिल्या पर्वामध्ये कश्मिरा व कृष्णा यांची धमाल बघायला मिळाली. मात्र आता या पर्वामध्ये रडताना दिसत आहे. (kashmira shah viral video)
‘लाफ्टर शेफ’मध्ये पहिल्या सीजनमध्ये कश्मिरा भाज्या ओळखू शकत नव्हती. आता या सीजनमध्ये असंच काहीस केलं आहे ज्यामुळे ती पुन्हा एकदा रडताना दिसत आहे. यामध्ये कृष्णा तिला समजावतानाही दिसत आहे. मात्र तरीही ती शांत होत नाही. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये कश्मिरा मंचावरच खाली बसून रडताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करत लिहिले की, “दुसऱ्या पर्वातही मटरला बिन्स म्हणाली आहे. या व्हिडीओमध्ये कृष्णा कश्मिराला उठवताना दिसत आहे. मात्र तरीही ती उठत नाही आणि मोठ-मोठ्याने रडताना दिसत आहे.
दरम्यान कश्मिराच्या या व्हिडीओवर अनेकजण खूप साऱ्या प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. एका नेटकऱ्याने लिहिले की, “मला ही आवडते. ही खूप मनोरंजन करते”, दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले की, “कश्मिरा व कृष्णा तुम्ही दोघंही खूप मस्त आहात”. तसेच काही जणांनी हसण्याच्या इमोजीदेखील पोस्ट केल्या आहेत. काही दिवसांपूर्वी कश्मिराचा अपघात झाल्याच्या अनेक बातम्या समोर आल्या होत्या. अपघातानंतरचे अनेक फोटोंदेखील तिने सोशल मीडियावर शेअर केले होते. कृष्णानेदेखील तिच्याबद्दल काळजी व्यक्त केली होती.
दरम्यान या पर्वाचे सूत्रसंचालन कॉमेडी क्वीन भारती सिंह व शेफ हरपाल हे करणार आहेत. या कार्यक्रमाचे अनेक प्रोमोदेखील प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहेत. हा कार्यक्रम २५ जानेवारीपासून शनिवारी व रविवारी रात्री ९.३० मिनिटांनी कलर्स वाहिनीवर पाहता येणार आहे.