बॉलीवूडमधील दोन दिग्गज कलाकार धर्मेंद्र व शबाना आझमी यांना कोण नाही ओळखत ? ह्या दोन्ही नटांनी आपल्या दमदार अभिनयाने एक काळ गाजवला होता. त्यामुळे त्यांची क्रेझ अजूनही कायम आहे. नुकताच रिलीज झालेला करण जोहरच्या ‘रॉकी और रानी की प्रेमकहाणी’ या सिनेमातून या दोन दिग्गजांनी बऱ्याच काळानंतर कमबॅक केलेले आहे. पण या सिनेमात एक असा सीन आहे, जो पाहून प्रेक्षकांना मोठा धक्का बसला.
आलिया भट्ट व रणवीर सिंह यांची मुख्य भूमिका असलेला हा सिनेमा काल मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला. पण त्याची चर्चा बऱ्याच दिवसांपासून सुरू असताना अशातच सिनेमातील एका सीनमुळे प्रेक्षकांना मोठा धक्का बसला आहे. ज्यामुळे हा सिनेमाची पुन्हा एकदा जोरदार चर्चा रंगते. करण जोहर दिग्दर्शित ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ भरपूर मसाल्याने भरलेला आहे. पण धर्मेंद्र व शबाना आझमी यांच्यातील एक इंटिमेट सीन पहिल्यांदाच पाहायला मिळाल्याने चाहते व प्रेक्षकांना मोठा धक्का बसला आहे. (rocky aur rani ki prem kahani intimate scene)
काय आहे या सीनमध्ये ? (rocky aur rani ki prem kahani intimate scene)
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र आणि शबाना आझमी यांनी या सिनेमात प्रथमच एक इंटिमेट सीन दिलेला आहे, जे पाहून प्रेक्षकांना मोठा धक्का बसला. हे दोन दिग्गज एकमेकांना किस करताना दिसत आहे. सिनेमात दोघांनी तोडीस तोड काम केलेलं आहे, पण त्यांच्या कामापेक्षा त्या इंटिमेट सीनची जोरदार चर्चा होताना पाहायला मिळते.
हे देखील वाचा : ‘प्रीमियरनंतर नवरा म्हणून ओळख करून दिलीस भारी फिलिंग होतं ते’ हेमंत ढोमेने केलं बायकोचं कौतुक
या दोन दिग्गजांच्या इंटिमेट सीनचा व्हिडिओ ट्विटरवर व्हायरल झाल्यानंतर नेटिझन्स यावर व्यक्त होताना दिसतायत. एका ट्विटर युजरने लिहिले की, ‘धर्मेंद्र आणि शबाना यांचे लिपलॉक अशी गोष्ट होती ज्याची कोणालाही अपेक्षा नव्हती.’ तर आणखी एका ट्विटर युजरने लिहिलंय, ‘रणवीर सिंह पूर्णपणे उत्साहित करणारा आहे. विचित्र आणि गोंडस असण्याचे मिश्रण आहे तो, परंतु धर्मेंद्र आणि शबाना यांच्या किसिंग सीनला तोड नाही.’ (rocky aur rani ki prem kahani intimate scene)
