करोडोंच्या घरात गल्ला जमवलेल्या ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाने चांगलीच हवा केली आहे. सहा बहिणींभोवती फिरणाऱ्या या कथेने प्रेक्षकांना खुर्चीत खिळून ठेवलं असं म्हणणं वावगं ठरणार नाही. चित्रपटात हिरो नसताना सहा स्त्रियांनी चित्रपटाचं कथानक अचूक पेललं आहे. बरं हा चित्रपट फक्त महाराष्ट्रातच नाही तर जगभरात धुमाकूळ घालतोय. (Baipan bhari deva inside story)
‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाची कथा ही काल्पनिक गोष्ट नाही आहे. लेखिका वैशाली नाईक यांनी या चित्रपटाचं कथानक लिहिलं आहे. वैशालीने सांगितलेली ही गोष्ट केदार शिंदे यांना भावली आणि त्यांनी लगेचच या चित्रपटासाठी होकार दिला. पण तुम्हाला माहित आहे का चित्रपटाची कथा ही काल्पनिक नाही आहे, खऱ्याखुऱ्या आयुष्यातील सहा बहिणींची आहे. लेखिका वैशाली नाईक हिने सोशल मीडियावरून काही फोटो शेअर करत या सिनेमाच्या कथेमागची गोष्ट उलगडली आहे. तसेच काही दिवसांपूर्वी तिने एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सिनेमाची सिनेमा कशी सुचली याबद्दल सांगितलं होतं.
पहा ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाची INSIDE STORY (Baipan bhari deva inside story)
‘बाईपण भारी देवा’ सिनेमाची गोष्ट लेखिका वैशाली नाईक हिनं २०१८ मध्ये लिहिली. वैशालीची आई सेवानिवृत्त झाल्यानंतर वैशालीने ही गोष्ट लिहिली. आईला पाच बहिणी आहेत. त्यावरूनच ही कथा सुचल्याचं तिनं सांगितलं.

वैशालीनं या मुलाखतीत सांगितलं की, “आईची मंगळागौर झाली नव्हती. त्यामुळं ती तिच्या वडिलांना सतत टोमणे मारायची. आई रिटायर्ड झाल्यानंतर तिच्यासमोर आता पुढं काय करायचं? असा प्रश्न होताच. त्यानंतर तिला एकटं वाटू लागलं. आपली गरज कोणालाच नाही, असंही तिला वाटायचं. त्यावरूनच मला बाईपण भारी देवा सिनेमाची कथा सुचल्याचं सांगितलं. तसंच या सिनेमात आई, आजी, मावशी यांचे खरे अनुभवही आहेत”, असंही तिनं सांगतिलं होतं.
हे देखील वाचा – जेव्हा एका महिन्यांनी सासूबाईंनी केले वनिताचे लाड, स्टोरी पोस्ट करत म्हणाली, “एका महिन्यानंतर..”
सहा बहिणींचा विविधरंगी जीवनप्रवास वैशालीने उत्तमरीत्या चित्रपटात मांडला आहे. सहा बहिणींभोवती फिरणाऱ्या या कथानकात सामाजिक, आर्थिक, भिन्न स्वभाववृत्ती या अंतर्गत स्त्रीचं भावविश्व अत्यंत मार्मिकतेने लिहिलेलं पाहायला मिळालं. तर तुम्ही ‘बाईपण भारी देवा’ हा सिनेमा पाहिला आहे का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.
