Shiva Serial Troll By Netizens : ‘झी मराठी’ वाहिनीवरील शिवा ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडतेय. या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली. मालिकेतील शिवा हे पात्र प्रेक्षकांच्या आवडत्या पात्रांपैकी एक आहे. मात्र आता मालिकेत खूप मोठा ट्विस्ट आला आहे. शिवा व आशु यांच्यात दुरावा आला असल्याचं मालिकेत पाहायला मिळत आहे.
दोघांमध्ये गैरसमज निर्माण झाल्याचे दिसत आहे. या गैरसमजूतीतूनच आशूने शिवाला घराबाहेर जाण्यास सांगितले. त्यामुळे शिवा सध्या तिच्या माहेरी आली आहे. माहेरी आल्यानंतर शिवा तिच्या आधीच्या स्टाईलमध्ये दिसत आहे. शिवाचा हा रावडी लूक तिच्या सासरच्यांना खटकत आहे.
मालिकेत आशु व शिवा यांच्या नात्यात दुरावा येण्यासाठी सिताई व किर्ती अनेक प्रयत्न करताना दिसत आहेत. सीताई म्हणजेच शिवाच्या सासूला शिवा सून म्हणून नको असते. आशूचे दुसरे लग्न व्हावे, यासाठी त्या प्रयत्न करताना दिसत आहेत. अशातच मालिकेच्या एका प्रोमोने साऱ्यांची उत्सुकता ताणली आहे. या प्रोमोमध्ये आशु दुसरं लग्न करण्यास तयार असल्याचं दिसत आहे. मालिकेत आलेला हा मोठा ट्विस्ट प्रेक्षकांच्या पसंतीस पडला नसून अनेकजण कमेंट करत ट्रोल करताना दिसत आहेत.
प्रोमोच्या सुरुवातीला रामभाऊ व आशू यांच्यात संवाद सुरु असल्याचं दिसतंय. रामभाऊ आशूला विचारतात की, तुला एक प्रश्न विचारायचा आहे. तू हा निर्णय का घेतलास?. तर प्रोमोमध्ये पुढे पाहायला मिळत आहे की, नेहा आशूला समजावते, “तू ना विचार करुन निर्णय घे. कारण, या निर्णयामुळे तुझ्या-माझ्या आयुष्याचा मार्ग तर ठरणारच आहे. पण, आपल्या कुटुंबाचदेखील भवितव्य ठरणार आहे. तर आशू नेहाला म्हणतो, “माझा होकार आहे”, त्याचे हे उत्तर ऐकून नेहाला मात्र धक्का बसल्याचे दिसत आहे. आशुने शिवाला सोडून नेहाबरोबर लग्न करण्यास होकार दिल्याने प्रेक्षकही नाराज आहेत.
हा प्रोमो पाहून अनेकजण मालिकेला ट्रोल करताना दिसत आहेत. “मालिकेत कशाचा कोणाला ताळमेळ नाही. काहीही दाखवतात. नेहाला काही गरज नसताना आणलं. सत्य तर लेखक विसरुन गेला. फक्त लग्न आणि भांडण एवढेच दाखवतात. आशूची किती लग्न दाखवतात. एक पण यशस्वी होत नाही”, “सत्य राहीले बाजुला निव्वळ लग्नाचा बाजार मांडलाय”, “शिवाचं प्रेम जिंकणार. तिच्यावर पूर्ण विश्वास आहे. आणि आता तिने पडती बाजू घ्यायलाच नको आहे. यांची खूप नाटकं झाली आता त्याने तिची माफी मागून प्रेम कबुल करायला हवं”, असं म्हणत काहींनी शिवाची बाजू घेतली आहे.