‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट सध्या अनेक नवीन रेकॉर्ड्स तयार करताना दिसत आहेत. मराठी सिनेमाला भरभरून मिळणार प्रेम मनाला सुखावणार आहे.एक महिन्या नंतरही चित्रपट तितक्याच जोमाने सुरु आहे हे खरं चित्रपटाचं यश म्हणता येईल.चित्रपटाची कथा, ६ कमाल अभिनेत्रींच्या अभिनयातील सहजता या साऱ्यानेच प्रेक्षकांना भुरळ घातली. अभिनेत्री वंदना गुप्ते, सुकन्या मोने, दीपा परब, सुचित्रा बांदेकर, शिल्पा नवलकर आणि रोहिणी हट्टंगडी या ३ तास प्रेक्षकांना चित्रपटगृहात खिळवून ठेवण्यात नक्कीच यशस्वी झाल्या.(kedar shinde about maharashtra shahir)
‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाच्या आधी केदार शिंदेंचा ‘महाराष्ट शाहीर’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला.अभिनेता अंकुश चौधरीने शाहीर साबळे अक्षरशः डोळ्यासमोर उभे गेले.मधुमास या गाण्याला तर प्रेक्षकांनी उचलून धरलं. सोशल मीडियावर हे गाणं चांगलंच वायरल देखील झाला. महाराष्ट्र शाहिरीला चांगला प्रतिसाद मिळाला असला तरी, ‘बाईपण भारी देवा’ इतकं यश या चित्रपटाला मिळालं नाही. या बाबत दिग्दर्शक केदार शिंदे यांनी एका मुलाखती मध्ये वक्तव्य केलं आहे.
पाहा काय म्हणाले केदार शिंदे? (kedar shinde about maharashtra shahir)
केदार शिंदे म्हणाले,’महाराष्ट्र शाहीर’ हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आणि त्याचदरम्यान एक दुसरा चित्रपट प्रदर्शित झाला. त्यामुळे ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटाला कमी स्क्रीन्स मिळाल्या. हा एक मुद्दा आहे.
त्याबरोबरच हा चित्रपट तरुणांनी पाहावं, अशी अपेक्षा त्यांना होती. ते काही फारसं घडलं नाही. तो चित्रपट लोकांपर्यंत पोहोचला. हा चित्रपट ज्यांनी पाहिला, त्यांना तो आवडलाही. शाहीर साबळे यांच्या कार्याचे, कर्तृत्वाचे डॉक्युमेंटेशन होणं त्यांच्यासाठी महत्त्वाचं होतं. हा चित्रपट म्हणजे एक पुस्तक आहे. आज ना उद्या कुणीतरी ते उघडून वाचणार”, असं ते म्हणाले.

‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटच प्रमोशन ही उत्तम पद्धतीने करण्यात आलं. चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर देखील हे प्रमोशन सुरु राहील.कोणत्या ही चित्रपटाच्या यशामध्ये प्रमोशन या घटकाचा नक्कीच मोठा वाटा असतो.नुकतीच बाईपण भारी देवा ची success पार्टी अगदी दणक्यात पार पडली. या चित्रपटाच्या निमित्ताने पडद्यासमोरील कलाकारांचं जितकं कौतुक झालं,तितकंच दिग्दर्शक आणि गाण्याचं देखील झालं.(baipan bhari deva)
हे देखील वाचा : ‘बाईपण भारी देवा’च्या टीमसह दिग्दर्शक केदार शिंदे गेले देवदर्शनाला, घेतले कोल्हापूरच्या अंबाबाईचे दर्शन