Bigg Boss 18 Trophy : ‘बिग बॉस १८’ च्या ग्रँड फिनालेला फक्त सहा दिवस बाकी आहेत. आता या शोच्या विजेत्याची ट्रॉफी कोणाला मिळणार याची सर्वांनाच प्रतीक्षा आहे. याचबरोबर चाहतेही यंदाच्या ट्रॉफीच्या झलक पाहण्याची आतुरतेने वाट पाहत होते. अखेर सलमानने ‘बिग बॉस’च्या चाहत्यांना दाखवून दिले आहे की यावर्षी ‘बिग बॉस १८’ची ट्रॉफी कशी असेल. चाहते त्या संध्याकाळची आतुरतेने वाट पाहत आहेत जेव्हा शोचे दोन बलाढ्य खेळाडू शेवटच्या रात्री सलमान खानच्या दोन्ही बाजूला असतील. विजेत्याला शोची ट्रॉफी सुपूर्द करण्यापूर्वी, सलमान त्याच्या प्रसिद्ध शैलीत विजेत्याबरोबर मजा करताना दिसणार आहे आणि शेवटी विजेत्याच्या नावाची घोषणा करेल.
या शोचा होस्ट सलमान खानने नुकतीच चाहत्यांना ट्रॉफीची झलक दाखवली, त्यानंतर फिनालेबद्दल चाहत्यांची उत्सुकता आणखीनच वाढली. सोशल मीडियावर दिसलेल्या व्हिडीओ क्लिपमध्ये सलमान म्हणाला, “या वर्षातील सर्वात मोठा फिनाले १९ जानेवारीच्या रात्री होणार आहे. ‘बिग बॉस’चा ग्रँड फिनाले खूप खास असणार आहे. या व्हिडीओमध्ये ट्रॉफीची झलकही पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे या ट्रॉफीचे डिझाईन दिवंगत सिद्धार्थ शुक्लाने जिंकलेल्या ‘बिग बॉस १३’मध्ये दिलेल्या ट्रॉफीसारखे आहे.
नाटक, भावना आणि खडतर स्पर्धेने भरलेल्या शोचा १५ आठवड्यांचा हा रोमांचक प्रवास संपणार आहे. जसजसा फिनाले जवळ येत आहे, तसतसे चाहते विजेतेपदाच्या प्रमुख दावेदारांचा अंदाज लावण्यात व्यस्त आहेत. या अंतिम फेरीत करण वीर मेहरा, विवियन डिसेना, अविनाश मिश्रा, चुम दरंग आणि ईशा सिंग यांचा समावेश आहे. या सर्व खेळाडूंनी शोच्या शेवटपर्यंत पोहोचण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे.
आणखी वाचा – ऑस्ट्रेलियात पूजा सावंतची लग्नानंतरची पहिली मकर संक्रांत, आई-वडीलही होते उपस्थित, व्हिडीओ समोर
‘बिग बॉस १८’ चा मोस्ट अवेटेड ग्रँड फिनाले १९ जानेवारी २०२५ रोजी प्राइम टाइम स्लॉटमध्ये रात्री ९:३० वाजता प्रसारित होईल, जो सुमारे तीन तास चालेल. या शोचा ग्रँड फिनाले १९ जानेवारीच्या रात्री कलर्स टीव्हीवर तसेच जिओ सिनेमावर पाहता येईल. जो कोणी या शोचा विजेता ठरेल त्याला ट्रॉफीसह मोठे रोख रकमेचे बक्षीस मिळेल. ही बक्षीस रक्कम सुमारे ५० लाख रुपये असू शकते, अशी चर्चा आहे.