एकेकाळी असं म्हटलं जायचं, की सिनेसृष्टीत आघाडीच्या अभिनेत्रींमधील मैत्री कधीच टिकत नसते. पण हे चित्र आज क्वचित दिसत असून अनेक अभिनेत्री एकमेकांच्या घट्ट मैत्रिणी बनल्या आहेत. मराठी सिनेसृष्टीतील दोन आघाडीच्या अभिनेत्री गेल्या अनेक वर्षांपासून चांगल्या मैत्रिणी असून दोघींच्या मैत्रीची अनेकदा चर्चा होत राहते. ती म्हणजे अभिनेत्री सई ताम्हणकर व सोनाली कुलकर्णी. (sai tamhankar & sonalee kulkarni)
मराठी व हिंदी सिनेसृष्टीतील बोल्ड, बिंदास अभिनेत्री सई ताम्हणकर तिच्या अभिनयाबरोबरच पर्सनल लाईफमुळे अनेकदा चर्चेत राहते. सईचा मोठा फ्रेंडसर्कल असून सिनेसृष्टीतील अनेक कलाकार सईचे चांगले मित्र आहेत. सईची अशीच एक जिगरी मैत्रीण म्हणजे अभिनेत्री सोनाली कुलकर्णी. पण सईने सोनाली व तिच्या नवऱ्याला एकदा उपाशी ठेवलं असून तशी कबुली तिने नुकतीच दिली आहे.
संगीतकार अवधूत गुप्ते यांचा ‘खुपते तिथे गुप्ते’ कार्यक्रम छोट्या पडद्यावर सुरु असून कार्यक्रमात आजवर अनेक मान्यवरांनी हजेरी लावली. कार्यक्रमाच्या नव्या भागात अभिनेत्री सई ताम्हणकर येणार असून त्याचा नवा प्रोमो नुकताच समोर आला. या प्रोमोमध्ये अवधूत सईला त्याला खुपणारी प्रश्न विचारतो, त्याची उत्तरे देताना सईने सोनाली कुलकर्णीचा एक किस्सा सांगताना तिने सोनाली व तिच्या नवऱ्याला उपाशी ठेवल्याचे कबूल केलंय. (sai tells the reason behind starving sonalee and her husband)
सईने सांगितली सोनाली कुलकर्णी व तिच्या नवऱ्याला उपाशी ठेवण्यामागचं कारण (sai tells the reason behind starving sonalee and her husband)

प्रोमोमध्ये अवधूत सईला विचारतो, की ‘तू लोकांना घरी जेवायला बोलावतेस आणि मुद्दामहून तासंतास उपाशी ठेवतेस हे खरं आहे का ?’ त्यावर सई सुरुवातीला नाही म्हणते. पण पुढे म्हणाली ‘सोनाली कुलकर्णीचं लग्न झाल्यावर मी तिला आणि तिच्या नवऱ्याला घरी जेवायला बोलावलं होतं. आम्ही घरी खूप टाईमपास करत होतो, मॅच बघत होतो. पण आम्ही गप्पा आणि टाईमपास करण्यामध्ये इतके गुंतलो की दुपारचा लंच मी बनवणार होते तो डिनर झाला.’ सईचा हा प्रोमो सध्या जोरदार व्हायरल होतोय. (Sai tamhankar in khupte tithe gupte)
अभिनेत्री सई ताम्हणकर व सोनाली कुलकर्णी यांनी झपाटलेला २, क्लासमेटस, धुराळा अशी अनेक सिनेमे एकत्र काम केलेली आहे. दोघींमध्ये छान बॉण्डिंग जुळत असून दोन्ही अभिनेत्रींचे सोशल मीडियावर रील्स व फोटोजची अनेकदा चर्चा होते.

हे देखील वाचा : ‘वडापाव’ ठरला जयंत सावरकरांच्या मृत्यूचं कारण? मंगेश देसाईंनी केला खुलासा