Uorfi Javed Supports Dhanashree Verma : कोरिओग्राफर व डान्सर धनश्री वर्मा सध्या पती युजवेंद्र चहलबरोबर घटस्फोटाच्या बातम्यांमुळे चर्चेत आहे. दरम्यान, सोशल मीडियावर लोक धनश्रीचे नाव इतर नावांबरोबर जोडत आहेत. कधी धनश्रीचे नाव क्रिकेटर श्रेयस अय्यरबरोबर तर कधी कोरिओग्राफर प्रतीक उतेकरबरोबर जोडले गेले. अशा परिस्थितीत आता उर्फी जावेद संतापली असून धनश्रीच्या समर्थनार्थ उतरली आहे. उर्फी जावेदने तिच्या इंस्टाग्रामवर एका व्हिडीओचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे ज्यामध्ये युझवेंद्र चहल आणि धनश्रीचे फोटो दिसत आहेत. उर्फीने धनश्री व युजवेंद्र यांच्या वेगळे होण्याच्या प्रकरणाबाबत सडेतोड उत्तर दिलं आहे. यावेळी उर्फीने मात्र धनश्रीच्या बाजूने आपले मत मांडलं आहे. धनश्रीवर टीका करणाऱ्यांना उर्फीने चांगलंच उत्तर दिलं आहे.
उर्फीने व्हिडीओ शेअर करत असं म्हटलं की, “दोन प्रकारच्या स्त्रिया असतात ज्या तुमचं सर्व काही उध्वस्त करु शकतात”. उर्फीने या स्क्रीनशॉटसोबत एक लांबलचक कॅप्शन लिहून म्हटले आहे की, “पुरुषांच्या गैरकृत्यांसाठी नेहमीच महिलांना दोषी ठरवले जाते”. उर्फीने लिहिले आहे की, “जेव्हाही क्रिकेटरचा ब्रेकअप होतो किंवा घटस्फोट घेतो तेव्हा त्या महिलेलाच शाप दिला जातो. आणि याचं कारण म्हणजे आपल्या मनात आपला क्रिकेटर आपला हिरो असतो. नताशा व हार्दिकच्या अफेअर दरम्यान दोघांमध्ये नेमके काय घडले आहे हे आपल्यापैकी कोणालाही माहिती नाही, परंतु हे निश्चित आहे की ही महिला नेहमीच चुकीची असते. विराटच्या खराब कामगिरीसाठी अनुष्काला जबाबदार धरण्यात आलेले हे सुद्धा विसरून चालणार नाही”.
आणखी वाचा – “तुम्ही पारूला सून म्हणून कधी स्वीकारणार?”, प्रश्न विचारताच अहिल्यादेवींचं धक्कादायक उत्तर, म्हणाल्या…

अभिनेत्रीने पुढे लिहिले की, “मग पुरुषांच्या गैरकृत्यांसाठी नेहमीच महिलांना दोषी धरले जाते का?”, असा सवाल उपस्थित केला आहे. धनश्री व युजवेंद्र यांनी इंस्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलोही केले आहे, त्यानंतर या अफवांना वेग आला आहे. घटस्फोटाच्या बातम्यांदरम्यान सोशल मीडियावर लोक धनश्रीवर एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरचा आरोप करत होते. अशा परिस्थितीत आता धनश्रीने घटस्फोटाच्या बातमीत तथ्य आहे की नाही याबाबत काहीही सांगितले नसले तरी तिने पोस्ट शेअर करत उत्तर दिलं आहे.
आणखी वाचा – कोकणहार्टेड गर्लची लगीनघाई! अंकिता वालावलकर व कुणाल भगतचं साग्रसंगीत केळवण, पहिला फोटो समोर
तर काही दिवसांपूर्वी या चर्चांवर युजवेंद्र चहलने आपल्या सोशल मीडियावर एक भावुक पोस्ट शेअर केली होती. चहलची ही स्टोरी व्हायरल झाली. या स्टोरीतून दोघांमध्ये सर्व काही ठीक नसल्याचा अंदात वर्तवण्यात आला. चहलने या स्टोरीतून स्वत:ला चांगला खेळाडू, चांगला मुलगा, चांगला भाऊ आणि चांगला मित्र असं म्हटलं.