‘कुंडली भाग्य’ या लोकप्रिय मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे रुही चतुर्वेदी. या मालिकेत तिने शर्लिन खुराना ही भूमिका साकारली होती. आपल्या अभिनयाने चर्चेत राहणारी ही अभिनेत्री वैयक्तिक कारणामुळे चर्चेत आली आहे. ते म्हणजे अभिनेत्री रुही चतुर्वेदी नुकतीच आई झाली आहे. लग्नाच्या पाच वर्षांनी तिने बाळाला जन्म दिला आहे. तिने एका मुलीला जन्म दिला आहे. तिचा पती आणि सुप्रसिद्ध अभिनेता शिवेंद्र ओम सैनीओलबरोबरचा खास फोटो शेअर करत आपल्या पहिल्या बाळाचे स्वागत केले आहे. याबद्दल सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिने माहिती दिली आहे. ०९ जानेवारी २०२५ रोजी आई झाली आहे. (ruhi chaturvedi blessed with baby girl)
रुही चतुर्वेदी आणि तिचा पती शिवेंद्र ओम सैनीयोल यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये “या जगात बाळाचे स्वागत आहे” असे लिहिले आहे. रुही आणि शिवेंद्रच्या पोस्टनुसार, अभिनेत्रीने ०९ जानेवारीला मुलीला जन्म दिला. पोस्टच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले की, “आमची मुलगी आली आहे.” रुही चतुर्वेदीची पोस्ट पाहून अनेक टीव्ही कलाकारांनी त्यांचे अभिनंदन केले. रुही चतुर्वेदीच्या पोस्टवर प्रतिक्रिया देताना अभिनेत्री श्रद्धा आर्याने लिहिले, “वाह. आता मी माझ्या जिलेबीला भेटण्याची प्रतीक्षा करू शकत नाही”.
आणखी वाचा – सुरेश वाडकरांपासून ते शंकर महादेवनपर्यंत…; बॉलिवूडसह मराठी गायकांच्या आवाजाने महाकुंभ २०२५ होणार सुरमयी
शिवाय अरिजित तनेजा, शीझान खान, अभिषेक कपूर, मानसी श्रीवास्तव आणि पूजा बॅनर्जी यांसारख्या अनेक कलाकारांनीही कमेंट करून रुही व शिवेंद्र यांचे अभिनंदन केले आहे. रुही चतुर्वेदी लग्नाच्या पाच वर्षानंतर आई झाली आहे. तिने शिवेंद्र ओम सैनीओबरोबर २०१९ मध्ये लग्न केले. लग्नाच्या 5 वर्षांनंतर जोडप्याच्या घरात बाळाच्या आगमनामुळे आनंदी वातावरण आहे.
आणखी वाचा – फराह खान की कंगणा रणौत? तुझी आवडती दिग्दर्शिका कोण? श्रेयस तळपदे म्हणाला, “माझ्या मते…”
अभिनेत्रीने तिच्या पतीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने चाहत्यांना तिच्या गरोदरपणाची खुशखबर दिली होती. ११ नोव्हेंबर २०२४ रोजी अभिनेत्री रुहीने तिचा बेबी बंप दाखवणारा व्हिडिओ शेअर केला होता. तेव्हापासून तिचे अनेक चाहते तिच्या आई होण्याची वाट बघत होते. अशातच आता तिने चाहत्यांना आई झाल्याची खुशखबर सांगितली आहे. त्यामुळे अनेक चाहत्यांनीही तिला सोशल मीडियाद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत.