Dahavi-A Third episode update : ‘इट्स मज्जा’ची ‘दहावी-अ’ ही वेबसीरिज ६ जानेवारीपासून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. ‘दहावी-अ’ची उत्सुकता लागून राहिली होती. अखेर ही सीरिज ६ जानेवारीपासून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. सोमवारी व गुरुवारी दुपारी १.३० वाजता ‘इट्स मज्जा’च्या युट्यूब चॅनेलवर प्रेक्षकांना पाहता येणार आहे. शाळेतील दहावीच्या वर्षात घालवलेल्या प्रत्येक खास आठवणींची शिदोरी घेऊन अनेकजण आपल्या एका नव्या आयुष्याला सुरुवात करतो. याच आठवणींचं भावविश्व ‘दहावी-अ’ सीरिजमधून पाहता येणार आहे. या सीरिजचा नुकताच पहिला भाग (सोमवार ०६ जानेवारी) रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला.
या पहिल्या भागात सुरुवातीला आभ्या, विक्या, किरण्या व मध्या हे चौघे इंग्रजी विषयाचा अभ्यास करताना पाहायला मिळाले. इंग्रजी विषयावरुन या मित्रांमधली मजामस्ती या सीनमध्ये पाहायला मिळाली. पुढे शाळेत पोहोचताच रेश्मा आभ्याकडे त्याची इंग्रजीची वही मागते आणि आभ्याही तिला वही देतो. तेवढ्यात त्याला कळतं की, केवडाला सुद्धा त्याच्या वहीची गरज आहे. त्यामुळे तो रेश्माला तिचं वहीचं काम झाल्यानंतर ती वही केवडाला देण्यास सांगतो. अशातच या सीरिजचा दूसरा भागही प्रेक्षकांच्या भेटीला आला.
या भागामध्ये शाळेच्या संस्थेतील एक मुख्य व्यक्ती शाळेच्या पाहणीसाठी येतात. यावेळी ते शाळेच्या दहावी-अ या वर्गाची पाहणी करतात. यावेळी त्यांचा वेखंड वाडीतील मुलांसाठीचा राग स्पष्ट दिसून येतो. तसंच यावेळी ते शाळेचे मुख्याध्यापक जंगम सर यांना दहावी-अच्या मुलांची आधीसारखीच वर्गवारी करण्यास सांगतात. यासाठी जंगम सरांची इच्छा नसते. मात्र त्यांच्या आदेशांपुढे जंगम सरांचे काहीच चालत नाही. पुढे शाळेत आलेल्या नवीन इंग्रजीच्या शिक्षिका शाळेतील सर्व मुलांचे इंग्रजीचे वाचन घेतात.
आणखी वाचा – मुलगी झाली हो! ‘कुंडली भाग्य’ फेम सुप्रसिद्ध अभिनेत्री झाली आई, लग्नाच्या पाच वर्षांनी दिली गुडन्यूज
यावेळी किरण्या, मध्या, सागऱ्या ही सर्व मुलं इंग्रजी वाचता येत नसल्याने मार खातात. पण आभ्या या सर्वांचे मन जिंकतो. त्याचे इंग्रजी वाचन पाहून शिक्षिका त्याचे कौतुक करतात. पुढे त्या इंग्रजीचा अभ्यास पूर्ण न केलेल्यांना शिक्षा देतात आणि यावेळी केवडाही मार खाते, कारण तिची वही पूर्ण नसते. केवडाने रेश्मामुळे मार खाल्ला असल्याचा गैरसमज आभ्या करतो आणि यामुळे तो तिच्यावर नाराज होतो.
आणखी वाचा – सुरेश वाडकरांपासून ते शंकर महादेवनपर्यंत…; बॉलिवूडसह मराठी गायकांच्या आवाजाने महाकुंभ २०२५ होणार सुरमयी
त्यामुळे आता रेश्मा आभ्याला तिच्याविषयी झालेला हा गैरसमज दूर करणार का? तसंच आभ्याच्या म्हणण्यानुसार रेश्मामुळे केवडाला मार खावा लागला ही सल रेश्मा तिच्या मनातून दूर करु शकणार का? आणि केवडाकहा इंग्रजीचा अभ्यास पूर्ण केल्यामुळे रेश्मा तिचे मन जिंकणार का? या आणि आशा अनेक प्रश्नांची उत्तरं येत्या तिसऱ्या भागात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे आता या आगामी भागासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत हे नक्की…