दिग्दर्शक केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी या देवा’ या चित्रपटाची क्रेज सर्वत्र रंगलेली दिसतेय. करोडोंच्या घरात गल्ला जमवलेल्या या चित्रपटाने प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं. आघाडीच्या दिग्दर्शकाच्या नावात आता दिग्दर्शक केदार शिंदे यांचं नाव अग्रस्थानी आहे. आज ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाने घवघवीत यश जरी संपादन केलं असलं तरी केदार शिंदे यांचा इथवरचा प्रवास काही सोप्पा नव्हता. ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाच्या success party लाही त्यांनी याबद्दल सांगितलं. “आजवर १६ सिनेमे केले मात्र त्यापैकी हा पहिलाच सिनेमा असेल ज्याची मी success party अटेंड करतोय”, असं म्हटलंय. (Kedar shinde struggle story)
केदार शिंदे यांना त्यांच्या करिअरमध्ये अनेक चढ-उतारांना सामोरं जावं लागलं. ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटासाठी दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी स्ट्रगलबद्दल भाष्य केलं आहे. ‘जत्रा’ सिनेमाच्या वेळी त्यांच्यावर बरंच कर्ज असल्याचं सांगत त्यांनी याबद्दल मोकळेपणाने भाष्य केलं आहे.
पाहा केदार शिंदे यांच्यावर का दागिने विकायची वेळ आली होती (Kedar shinde struggle story)
केदार शिंदे यांनी सांगितलं की, “‘जत्रा’ या चित्रपटादरम्यान माझं सर्व काही पणाला लावलं होतं. मी माझ्या बायकोचे दागिने विकले होते. प्रेक्षकांसाठी ‘जत्रा’ सुपरहिट ठरला. पण त्यावेळी माझ्या डोक्यावर ९० लाखांचं कर्ज होतं. त्यानंतरच्या वर्षांमध्ये माझ्या हातून बरे-वाईट चित्रपट झाले. ‘अगंबाई अरेच्चा २’ चालला नाही. इंडस्ट्रीतील अनेकांनी प्रीमिअरला हा चित्रपट पाहिला होता. सर्वांनी त्याचं कौतुक केलं.
पण चित्रपट वाईट झाला आहे हे कुणीही सांगितलं नाही. ज्यांना आपलं मानलं त्यांनी असं करावं? प्रदर्शनाच्या दिवशी सगळीकडे नकारात्मक चर्चा होती, त्यामुळे मी दुखावलो आणि हिंदी मालिकाविश्वाकडे वळलो. इथेही काम करण्यासाठी मला समोरून विचारण्यात आलं होतं.” असं म्हणत त्यांनी सिनेमासृष्टीतील त्यांचा स्ट्रगल पिरियडबद्दल सांगितलं आहे.
हे देखील वाचा – अधिकमासनिमित्त अरुण कदम यांनी केला लेक व जावयाचा मानपान
अथक प्रयत्नानंतर ‘बाईपण भारी देवा’ सिनेमाने बॉक्सऑफिसवर बक्कळ कमाई केली असून चित्रपटातील कलाकारांनी हा चित्रपट एका उंचीवर नेऊन ठेवला आहे.
