ज्येष्ठ नाट्य व सिने अभिनेते जयंत सावरकर यांचं वृद्धापकाळाने निधन झाले आहे. वयाच्या ८८ व्या वर्षी त्यांनी ठाण्यातील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. जयंत सावरकर यांच्या निधनाच्या बातमीने सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे. अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत जयंत सावरकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे. अशातच अभिनेता समीर चौघुले यांनीही जयंत सावरकर यांच्याबद्दल पोस्ट लिहीत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. (Samir choughule Post)
समीर चौघुले यांनी जयंत सावरकर यांचा फोटो शेअर करत त्याखाली पोस्ट लिहीत लिहिलंय की, दिग्गज रंगकर्मी नटश्रेष्ठ अण्णा सावरकर गेले…तरुणांना ही लाजवेल अशी एनर्जी असणारा सच्चा रंगकर्मी गेला….नागपूरच्या नाट्य संमेलनात आम्ही दोघे रूम पार्टनर होतो….”समीर तू बिनधास्त रात्री उशिरा पर्यंत टिव्ही बघ हं….मला झोपेचा काहीच प्रॉब्लेम नाही..मला कुठे ही झोप लागते” अस म्हणून निमिषार्धात आमच्या वयातील दरी नाहीशी करून कोणत्या ही पिढीशी जुळवून घेणारे अण्णा त्या क्षणी प्रेमात पाडून गेले….
पाहा समीरने दिल्या जयंत सावरकरांसोबतच्या आठवणींना उजाळा (Samir choughule Post)
सतत दुसऱ्याचं कौतुक करण्याचा स्वभाव आणि त्यांच्या संगमरवरी कारकिर्दीचे किस्से यात पहाट कधी झाली हेच कळलं नाही…मी सतत सांगतोय “अण्णा तुम्ही झोपा..पण छे हा तरुण ऐकतोय कसला !….साधारणतः मैफल काही लोकांची असते..पण त्या रात्री मात्र रसिक फक्त “मी” होतो हे माझे भाग्य….असे हे आमचे दोस्त अण्णा…..तुमच्या सारख आयुष्यभर कलेला सावलीप्रमाणे घेऊन जगता आलं पाहिजे हो…अण्णा…आम्ही तुम्हाला खूप मिस करू…जिथे असाल तिथे मस्तच असाल.. असं म्हणत समीर यांनी जयंत सावरकर म्हणजेच अण्णा सावरकर यांच्या आठवणी शेअर केल्या आहेत.
हे देखील वाचा – जयंत सावरकर…. मूल्य, संस्कृती, सभ्यता, परंपरा जपणारा कलाकार
महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातून समीर चौघुले यांनी आजवर प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केले आहे. सध्या समीर चौघुले त्यांच्या हास्यजत्रेच्या टीमसोबत परदेश दौरा करण्यात व्यस्त आहेत. परदेश दौऱ्यांदरम्यानचे अनेक व्हिडीओ फोटोजही समीर यांनी आणि हास्यजत्रेच्या इतर टीमने चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.
