बी-टॉऊन मध्ये चर्चेत असलेल्या अभिनेत्रींनमध्ये उर्फी जावेदच नाव अग्रस्थानी असत असं म्हणणं वावगं ठरणार नाही. मॉडेल म्हणून ती सोशल मीडियावर विशेष चर्चेत असते. वेगवेगळे कपडे परिधान करून ती स्वतःला प्रेक्षकांसमोर आणि मीडियासमोर प्रेझेंट करण्याचा प्रयत्न करत असते. उर्फी जावेदने अलीकडेच तिच्या स्वतःवरील प्रेमाबाबतच्या प्रवासाचा खुलासा केला आहे. दरम्यान तिने हे देखील उघड केले आहे की ती १८ वर्षांची होती तेव्हापासून ती ओठांवर शस्त्रक्रिया करत आहे. दरम्यान उर्फीने स्वतःचे अनेक फोटो शेअर केले आहेत. याचसंबंधात योग्य क्लिनिक आणि डॉक्टरांकडून फिलर आणि शस्त्रक्रिया करून घेण्याबद्दल तिने एक पोस्ट शेअर केली आहे. (Urfi Javed Defends Fillers)
उर्फीने लिहिले आहे की, “माझा सर्व लिप फिलर प्रवास तुमच्यासोबत शेअर करत आहे. मी वयाच्या १८ व्या वर्षापासून लिप फिलर्स करत आहे, तेव्हा माझ्याकडे इतके पैसे नव्हते पण मला नेहमी वाटायचे की माझे ओठ खूप पातळ आहेत आणि मला मोठे फुलर ओठ हवे आहेत. मी dermat deni ला गेले तिथे ते कमी किंमतीत लीप फिलर्स करायला तयार झाले.
पाहा उर्फीने लीप फिलर्सला काय दिला सल्ला (Urfi Javed Defends Fillers)
ती पुढे म्हणाली, “लक्षात ठेवा की ही आतापर्यंतची सर्वात वेदनादायक गोष्ट आहे !! मी लोकांना ते करू नका असे सांगत नाही पण खरं तर मी जे सांगण्याचा प्रयत्न करत आहे ते म्हणजे फिलर्स किंवा बोटॉक्स घेताना काळजी घ्या. माझ्याकडे अजूनही लिप फिलर्स आहेत फक्त मला माहित आहे की माझ्या चेहऱ्याला काय अनुकूल आहे आणि मला माहित आहे की आता कमी जास्त काय आहे.” (Urfi Javed fan moment)
“कोणत्याही डॉक्टरकडे जाण्यापूर्वी प्रत्येकाला संपूर्ण संशोधन करण्यास प्रोत्साहित करायला हवं, जर तुम्हाला तुमच्या चेहऱ्याबद्दल किंवा शरीराबद्दल काही असुरक्षितता असेल तर स्वतःचा किंवा तुमच्या चेहऱ्याचा तिरस्कार करण्याऐवजी फिलर्स किंवा शस्त्रक्रिया निवडणे चांगले आहे, परंतु केवळ एका चांगल्या डॉक्टरकडून.
हे देखील वाचा – जगभरातील बॉक्स ऑफिसला पडली ‘बार्बी’ची भुरळ ! पण भारतात मात्र परिस्थिती वेगळी…
तिने पोस्ट शेअर करताच नेटकऱ्यांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. मात्र, तिच्या एका चाहत्याने तिच्या प्रामाणिकपणाचे कौतुक केले. “प्रामाणिक आणि वास्तविक असल्याबद्दल धन्यवाद. आणि तुम्ही कोण आहात म्हणून स्वत:ला स्वीकारा असे म्हणणाऱ्या लोकांसाठी… हे तिचे शरीर आहे आणि जर तिला ते आवडत असेल तर तसे व्हा. ती कोणालाही फिलर किंवा शस्त्रक्रिया करण्याची शिफारस करत नाही. ती म्हणतेय की ज्यांना असं करायचे असेल तर चांगला डॉक्टर निवडा. नैसर्गिक हे सर्वोत्कृष्ट आहे पण जर ते तुम्हाला आनंद देत नसेल तर का नाही,”असं म्हणत उर्फीच्या चाहत्याने तिच्या या पोस्टला पाठिंबा दर्शविला आहे.