Yuzvendra Chahal in Bigg Boss 18 : सलमान खानचा ‘बिग बॉस १८’ हा शो अनेक कारणांमुळे चर्चेत आहे. हा रिऍलिटी शो सुरु झाला तेव्हापासून साऱ्यांच्या पसंतीस पडला. या शोमधील स्पर्धकांपासून ते शोच्या पाहुण्यांपर्यंत सगळेच चर्चेत असतात. आता क्रिकेटर युजवेंद्र चहलही या शोमध्ये येणार असल्याच्या बातम्या येत आहेत. युजवेंद्र चहल ‘विकेंड का वार’मध्ये दिसणार असल्याच्या बातम्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. युजवेंद्र चहल सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. युजवेंद्र आणि त्याची पत्नी धनश्रीमध्ये मतभेद सुरु असून लवकरच त्यांचा घटस्फोट होणार असल्याचं बोललं जात आहे. क्रिकेटरच्या वैयक्तिक आयुष्यात चढ-उत्तर सुरु असताना युजवेंद्र ‘बिग बॉस १८’मध्ये दिसणार असल्याचं समोर आलं आहे.
‘न्यूज १८’च्या बातमीनुसार, युजवेंद्रबरोबर क्रिकेटर श्रेयस अय्यर आणि शशांक सिंग देखील दिसणार आहेत. शोच्या निर्मात्यांनी अद्याप तिघांच्या प्रवेशाबाबत कोणतेही अधिकृत अपडेट जारी केलेले नाही. पण जर युजवेंद्र चहल शोमध्ये आला तर शोच्या टीआरपीला त्याचा फायदा नक्कीच मिळण्याची अपेक्षा आहे. युजवेंद्र आणि धनश्री या जोडप्याने या घटस्फोटाच्या अहवालांना थेट संबोधित केले नाही. अशा परिस्थितीत युजवेंद्र चहल ‘बिग बॉस १८’ मध्ये दिसला तर तो त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल काय बोलणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
आणखी वाचा – फरहान अख्तर लवकरच होणार बाबा?, ४४व्या वर्षी शिबानी दांडेकर गरोदर, लग्नाच्या तीन वर्षांनंतर निर्णय
युजवेंद्र चहल आणि धनश्रीने इंस्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो केले आहे. युझवेंद्र चहलनेही त्याच्या इन्स्टाग्रामवरुन धनश्रीबरोबरचे सर्व फोटो हटवले आहेत. मात्र, सध्या धनश्रीचे युजवेंद्रबरोबरचे काही फोटो इन्स्टाग्रामवर दाखवले जात आहेत. धनश्रीने बुधवारी रात्री एक पोस्ट शेअर केली होती. यांत तिने या चर्चांवर मौन सोडले आहे. “गेले काही दिवस त्याच्यासाठी आणि त्याच्या कुटुंबासाठी खूप कठीण गेले आहेत. ट्रोलिंग आणि निराधार लिखाणामुळे नाराज आहे”, असं म्हणत तिने पोस्ट शेअर केली होती.
घटस्फोटाच्या बातम्यांदरम्यान सोशल मीडियावर लोक धनश्रीवर एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरचा आरोप करत होते. तिचे नाव कोरिओग्राफर प्रतीक उतेकरबरोबर जोडले जात होते. अशा परिस्थितीत आता धनश्रीने घटस्फोटाच्या बातमीत तथ्य आहे की नाही याबाबत काहीही सांगितले नसले तरी सर्वांनाच उत्तर दिले आहे.