बॉलिवूडमधील काही लोकप्रिय स्टारकिड्सपैकी एक स्टारकिड म्हणजे अभिनेत्री अनन्या पांडे. अनेक चित्रपटांमधून ती आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. अनन्या पांडे कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यापासून अभिनेत्री तिच्या चित्रपटांपेक्षा खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत राहिली आहे. अनेक सेलिब्रिटींबरोबर अनन्याच्या नावाची चर्चा रंगते. अलीकडेच तिचे नाव अभिनेता आदित्य रॉय कपूर कपूरबरोबर जोडले गेले होते. यानंतर त्यांच्या ब्रेकअपच्याही समोर आल्या होत्या. अशातच आता तिने आपल्या नात्याविषयी व मुलांविषयी एका मुलाखतीत भाष्य केलं आहे. ‘फोर्ब्स इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत अनन्याने लग्न आणि मुलांबद्दल खुलेपणाने भाष्य केलं. (ananya pandey on marriage children and her future plans)
या मुलाखतीत अभिनेत्री अनन्या पांडेला विचारले की, “ती येत्या पाच वर्षांत स्वत:ला कुठे पाहते. तू तुझ्या वैयक्तिक आयुष्यात काही नवीन करणार आहेस का?”. यावर अभिनेत्रीने तिच्या भविष्यातील योजनांबद्दल सांगितले. याबद्दल ती म्हणाली की, “वैयक्तिकरित्या, आजपासून पाच वर्षांनंतर मी स्वतःला विवाहित, आनंदी, स्थिर घर, मुले असलेल्या भूमिकेत पाहत आहे”. या मुलाखतीत अनन्या पांडेने तिच्या कामाबद्दलही सांगितले. याबद्दल ती म्हणाली की, “मी स्वत:ला खेळात अव्वल पाहते आहे. तिथे नेहमीच स्पर्धा असते पण सध्या मी काम करण्यावर आणि माझ्या कामात चांगले होण्यावर लक्ष केंद्रित करत आहे”.
आणखी वाचा – कार्तिकी गायकवाडच्या भावाची लगीनघाई, शेअर केले लग्न ठरल्यानंतरचे फोटो, शुभेच्छांचा वर्षाव
अनन्याच्याचे नाव वॉकरबरोबर जोडल्याची चर्चा सोशल मीडियावर झाली होती. अनंत अंबानींच्या लग्नात अनन्याने वॉकरला तिचा ‘साथी’ म्हणून लोकांसमोर आणले होते. दोघांचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले होते, ज्यामध्ये ते एकत्र रोमँटिक डान्स करताना दिसले होते. याबरोबरच हळदी समारंभातही दोघांची धमाल पाहायला मिळाली होती. मात्र, दोघांनीही अद्याप त्यांचे नाते जाहीर केलेले नाही. अनन्याच्या २६ व्या वाढदिवसानिमित्तही वॉकरने इन्स्टाग्रामवर एक सुंदर पोस्ट शेअर केली होती. वॉकर ब्लँको हा व्यवसायाने मॉडेल आहे.
आणखी वाचा – लग्नानंतरच्या पहिल्या मकरसंक्रांतीची तयारी करत आहे पूजा सावंत, खास दागिन्यांनी वेधलं लक्ष, व्हिडीओ समोर
दरम्यान, अनन्या पांडेच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, यावर्षी अनन्या ‘चांद मेरा दिल’मध्ये दिसणार आहे. याशिवाय अक्षय कुमार आणि आर माधवनबरोबरही अनन्याचा एक चित्रपट येणार आहे. या आगामी चित्रपटाची घोषणा झाली आहे, मात्र त्याचे नाव अद्याप जाहीर झालेले नाही. तिच्या नेटफ्लिक्स चित्रपट सीटीआरएलच्या यशानंतर, अनन्याने आणखी अनेक भूमिकांसाठी तयारी सुरू केली आहे. सीटीआरएलपूर्वी अनन्या ‘कॉल मी बे’ या सीरिजमध्ये दिसली होती.