‘तारक मेहता का उलटा चष्मा’ या सुप्रसिद्ध मालिकेतील लोकप्रिय पात्र रोशन सिंह म्हणजे गुरुचरण सिंह बेपत्ता झाला होता. त्याच्या अचानक बेपत्ता होण्याच्या वृत्ताने त्याच्या कुटुंबियांसह चाहत्यांमध्येही भीतीचे वातावरण झाले होते. तो जवळपास महिनाभर बेपत्ता होता. त्यानंतर आता त्याच्याबद्द आणखी एक बातमी समोर येत आहे ती म्हणजे अभिनेता गुरुचरण सिंह रुग्णालयात दाखल झाला आहे. अभिनेत्याने स्वत: हॉस्पिटलमधून एक व्हिडीओ शेअर केला आहे, परंतु हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याचे नेमके कारण सांगितले नाही. पण त्याची अवस्था पाहून चाहते काळजीत पडले आहेत. अनेकजण त्याच्या तब्येतीबाबत विचारणा करत आहे. (gurucharan singh admitted)
गुरुचरण सिंहने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये अभिनेता हॉस्पिटलच्या एका बेडवर झोपलेला दिसत आहे. त्याच्या हाताला सलाइनही लावण्यात आली आहे. अभिनेता या व्हिडीओमध्ये असे म्हणत आहे की, “परिस्थिती खूपच वाईट झाली आहे”. नेमका कशामुळे रुग्णालयात दाखल झाला आहे याविषयी तो लवकरच सांगेल असे अभिनेत्याने म्हटलं आहे. या व्हिडीओत हेल्थ अपडेट देत त्याने चाहत्यांना गुरुपूरबनिमित्त शुभेच्छाही दिल्या आहेत. गुरुचरणचा हा व्हिडीओ त्याच्या चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे. “तुम्ही ठीक आहात का?”, “तुम्हाला नेमके काय झाले आहे?”, अशा अनेक प्रतिक्रिया या व्हिडीओवर चाहत्यांनी व्यक्त केल्या आहेत.
आणखी वाचा – ‘दहावी-अ’च्या पहिल्या एपिसोडला काही तासांमध्येच लाखो व्ह्यूज, प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद
तसंच काहींनी गुरुचरण खूपच बारीक झाला आहे आणि त्याने तब्येतीची काळजी घ्यावी असंही म्हटलं आहे. त्याचबरोबर गुरुचरण यांना लवकरात लवकर बरे वाटावे याकरता चाहते प्रार्थना करत आहेत. गुरुचरणने गेल्या महिन्यात त्यांच्या वडिलांचे काही व्हिडीओ शेअर केले होते, ज्यामध्ये त्यांनी सांगितले होते की त्यांच्या वडिलांचे हिमोग्लोबिन कमी झाले आहे. त्याचबरोबर त्याने दिल्लीच्या दीनदयाल उपाध्याय रुग्णालयात असल्याची माहितीही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये दिली.
आणखी वाचा – सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचं थाटामाटात केळवण, होणाऱ्या नवऱ्यासह जेवणावर मारला ताव, फोटो व्हायरल
दरम्यान, गेल्या वर्षी मे महिन्यात गुरुचरण अचानक बेपत्ता झाले होते. त्याच्या वडिलांनी पोलिस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली होती. तब्बल २५ दिवसांनी तो घरी परतला. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये तो रोशन सिंग सोढीची भूमिका साकारत होता, पण काही वर्षांनी त्याने हा शो सोडला. यादरम्यान, गुरुचरण सिंह बऱ्याच दिवसांपासून पडद्यापासून दूर होता.