काही मालिका अश्या असतात, त्या केवळ निखळ मनोरंजनाने प्रेक्षकांच्या मनात घर करतात. अशीच एक मालिका म्हणजे स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘ठिपक्यांची रांगोळी’ ही मालिका. ‘ठिपक्यांची रांगोळी’ या मालिकेने अवघ्या काही वर्षातच प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. अप्पू-शशांकची प्रेमळ केमिस्ट्री आणि कानिटकर कुटुंबाची सुंदर गोष्ट यांमुळेच मालिकेला प्रेक्षक प्रेम देत असून मालिकेची टीआरपी रेटिंग्ससुद्धा चांगली आहे. (thipkyanchi rangoli)
काही दिवसांपूर्वी ‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेने ५०० भागांचा टप्पा गाठला असून मालिका आता एका रंजक वळणावर आलेली आहे. असं म्हणतात की, मालिका या मालिकेतील कलाकारांमुळेच ओळखल्या जातात. अप्पू व शशांकचे जितके चाहते आहेत, तितकेच चाहते मालिकेतील अन्य कलाकारांचे देखील आहेत. अशीच एक भूमिका जी प्रेक्षकांच्या लक्षात राहते, ती म्हणजे विनायक कानिटकर म्हणजे दादाकाका. मालिकेत दादाकाकांची भूमिका करणारे ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे यांनी काही कारणास्तव ही मालिका सोडली असून आता त्यांची ही भूमिका साकारणार आहेत अभिनेते उदय टिकेकर. (sharad ponkshe exits in thipkyanchi rangoli)
हे आहे शरद पोंक्षे यांचे मालिका सोडण्यामागचे कारण (sharad ponkshe exits in thipkyanchi rangoli)
अभिनेते शरद पोंक्षे हे ‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेतून निरोप घेत असून याबद्दलचा एक व्हिडिओ वाहिनीच्या ऑफिशिअल पेजवरून पोस्ट करण्यात आला आहे. यात शरद पोंक्षे यांनी स्वतः ही मालिका सोडत असल्याबद्दलचा खुलासा केला आहे. व्हिडिओमध्ये शरद पोंक्षे म्हणाले, “गेली दोन वर्ष मी या मालिकेत विनायक कानिटकर ही भूमिका करत होतो. पण माझ्या पुढच्या प्रोजेक्ट्समुळे मी या मालिकेसाठी फार वेळ देऊ शकणार नाही. पण या मालिकेचे नुकसान होऊ नये, म्हणून ५०० भाग पूर्ण केल्यानंतर मी ही मालिका सोडलेली आहे. आणि माझ्या ठिकाणी माझाच अत्यंत परममित्र व उत्तम अभिनेता उदय टिकेकर विनायकदादांची भूमिका साकारणार आहे. जसं मला प्रेम दिलं, तसंच प्रेम तुम्ही उदय टिकेकर यांना व त्यांच्या या भूमिकेला द्याल, अशी मला खात्री आहे. तेव्हा एका नवीन मालिका व नाटकांमधून आपण परत भेटू.”
अभिनेते शरद पोंक्षे यांनी आजवर अनेक मालिका, नाटक व चित्रपट केले असून त्यांच्या प्रत्येक भूमिकेला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलंय. सध्यातरी शरद पोंक्षे या मालिकेतून निरोप घेत असले, तरी ते आगामी प्रोजेक्टसमधून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. शरद पोंक्षे हे ‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेबरोबरच ‘दार उघड बये’ मालिकेतही दिसले. शिवाय नुकतंच प्रदर्शित झालेल्या ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटातही त्यांची महत्वाची भूमिका होती. तर त्यांच्या जागी दादाकाकांच्या भूमिकेत दिसणारे अभिनेते उदय टिकेकर यांनीही अनेक मालिका व चित्रपटांत काम केले असून ‘जुळून येती रेशीमगाठी’ मालिकेत त्यांनी साकारलेली मेघनाच्या बाबांची भूमिका बरीच गाजली होती. (uday tikekar)

हे देखील वाचा : ज्येष्ठ नाट्य व सिने अभिनेते जयंत सावरकर यांचं वृद्धापकाळाने निधन