रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

जुई गडकरीच्या ‘त्या’ फोटोचा गैरवापर, अभिनेत्रीचा संताप, म्हणाली, “असे दुसऱ्याचे फोटो…”

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 7, 2025 | 12:04 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
tharala tar mag serial fame Jui Gadkari angry over the misuse of AI technology with post shared on instagram

एआय तंत्रज्ञानाच्या गैरवापरावर जुई गडकरी संतापली

आजकाल जवळपास सर्वच तांत्रिक क्षेत्रांत ‘आर्टिफिशियल इंटिलिजन्स’ अर्थात ‘एआय’ वापरलं जात आहे. हे तंत्रज्ञान हळूहळू लोकांना त्यांची विविध कामं पूर्ण करण्यास मदत करत आहे. कंटेंट तयार करणं असो, नवीन गोष्टी शिकणं असो किंवा फोटो तयार करणं असो… ही सगळी कामं ‘एआय’च्या मदतीने केली जात आहेत. या मात्र ‘एआय’चा अनेक क्षेत्रात सदुपयोग आहे, पण अनेकजण या तंत्रज्ञानाचा चुकीचा वापरही करताना दिसून येतात. या तंत्रज्ञानाचा चुकीच्या पद्धतीने वापर केल्याचे अनेक धक्कादायक प्रकार समोर आले आहेत. यावर कठोर कारवाईची मागणीही अनेकांनी केली आहे. याचबद्दल आता आणखी एका अभिनेत्रीने आपली नाराजी व्यक्त केली आहे. (jui gadkari angry on misuse of AI technology)

‘ठरलं तर मग’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणारी सायली म्हणजेच अभिनेत्री जुई गडकरीने याविषयी नाराजी व्यक्त केली आहे. जुई गडकरी ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. आपल्या आयुष्यातील प्रत्येक अपडेट्स, शूटिंगच्या सेटवरची धमाल, ‘ठरलं तर मग’ मालिकेचे प्रोमो ती नेहमी शेअर करते. तसंच सोशल मीडियाद्वारे ती अनेकदा विविध विषयांवर भाष्यही करते. अशातच तिने ‘एआय’ तंत्रज्ञानावर तिची नाराजी व्यक्त केली आहे. जुईच्या एका फोटोशूटचा वापर करुन तिच्या ऐवजी एका वेगळ्याच स्त्रीचा फोटो लावल्याचा व्हिडीओ तिने शेअर केला आहे आणि या व्हिडीओसह तिने असं कृत्य करणाऱ्यांवर आपली नाराजी व्यक्त केली आहे.

आणखी वाचा – रस्त्यांची परिस्थिती पाहून ‘तुला शिकवीन…’ फेम अभिनेत्याची खोचक पोस्ट, म्हणाले, “वर्षानुवर्षे…”

जुई गडकरीचे जांभळ्या रंगाच्या साडीतील फोटो एका नेटकऱ्याने वापरत जुईच्या चेहऱ्याऐवजी एका वेगळ्याच स्त्रीचा लावला आहे आणि एक व्हिडीओ बनवला आहे. हाच व्हिडीओ जुईने तिच्या इन्स्टाग्रामवर स्टोरीवर शेअर केला आहे आणि असं म्हटलं आहे की, “एआयचा गैरवापर. असे दुसऱ्याचे फोटो वापरणे चांगले नाही”. ‘एआय’ तंत्रज्ञानाच्या गैरवापर करत अनेक अभिनेत्रींचे अश्लील व मॉर्फ केलेले फोटो-व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे पाहायला मिळाले. रश्मिका मंदाना, कतरीना कैफ व आलिया भट्ट यासह अनेक अभिनेत्री डीपफेकला बळी पडल्या आहेत.

आणखी वाचा – सारा अली खानने श्रीशैलम मल्लिकार्जुन मंदिराला दिली भेट, खास फोटोही केले शेअर, म्हणाली, “वर्षातील पहिला सोमवार…”

दरम्यान, आता या एआयच्या चुकीच्या वापराबद्दल जुईनेही तिची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. तिच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, तिने ‘पुढचं पाऊल’ नंतर जुई अनेक मालिकांमध्ये दिसली होती. ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’, ‘वर्तुळ’, ‘सरस्वती’ या मालिकांमध्ये ती झळकली. ‘बिग बॉस मराठी’मध्येही जुई सहभागी झाली होती. सध्या ती ठरलं तर मग या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे आणि या मालिकेतील तिची भूमिका सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे

Tags: jui gadkari angry on misuse of AI technologyjui gadkari tharala tar magtharala tar mag serial fame jui gadkari
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Dhanashree Verma-Yuzvendra Chahal

"तुझा राग ग्राउंडवर काढ", धनश्री वर्माने युजवेंद्र चहलला दिलेला सल्ला, बाथरूममध्ये जाऊन रडला होता क्रिकेटर, व्हिडीओ व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.