सध्या ऑनलाईन फसवणुकीच्या अनेक घटना समोर येत आहेत. सोशल मीडिया अकाउंट हॅक होणं, लिंक्स द्वारे नागरिकांची फसवणूक करून हजारो, लाखो रुपयांना गंडा घालणं यांसारखे गुन्हे मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत.याबाबत जनजागृती केली जात आहे, पंरतु नकळतपणे अजूनही लोक या जाळ्यात अडकत आहेत.कलाकारदेखील अशा फसवणुकीचा सामना करत आहेत.अशीच एक घटना ‘कुंडली भाग्य’ फेम अभिनेत्री अभिनेत्री आकांक्षा जुनेजा सोबत घडली आहे. (akanksha juneja cheated)
पाहा नेमकं काय घडलं आकांक्षा सोबत (akanksha juneja cheated)
ऑनलाईन जेवण ऑर्डर करणं आकांक्षाला महागात पडलं.याबाबत एका मुलाखती मध्ये आकांक्षाने खुलासा केला आहे.म्हणाली, अलीकडे मी बाहेरून जेवण ऑर्डर केले तेव्हा मला एका कंपनीच्या नंबरवरून फोन आला. ज्यामध्ये कॉलरने मला ऑर्डरची पुष्टी करण्यासाठी माझ्या नंबरवर पाठवलेल्या लिंकवर क्लिक करण्यास सांगितले. जेव्हा मी त्याला असे का विचारले तेव्हा तो म्हणाला की हा एक नवीन प्रोटोकॉल आहे आणि मी लिंकवर क्लिक करताच दर पाच मिनिटांनी माझ्या खात्यातून १० हजार रुपये कापले जाऊ लागले.
“मी फक्त विचार करत होते की काय होत आहे आणि का होत आहे. मग मला ती लिंक आठवली आणि मी लगेच माझ्या बँकेत कॉल केला. माझे खाते ब्लॉक झाले. पण तेव्हा माझे ३०,००० रुपये गमावले होते. कष्टाने कमावलेले पैसे असे गेल्यावर खूप त्रास होतो.” (akanksha juneja cheated)

आकांक्षाला आलेल्या अनुभवानंतर तिने इतर नागरिकांना देखील जागरूक केले आहे. ती म्हणाली, “लोकांनी आजकाल होत असलेल्या ऑनलाइन घोटाळ्यांपासून खूप सावध राहावे. फसवणूक करणाऱ्याने मला पाठवलेल्या लिंकने माझा फोन हॅक केला. त्यामुळे कोणत्याही अज्ञात व्यक्तीने पाठवलेल्या लिंकवर कधीही क्लिक करू नका कारण आजकाल फसवणूक करणारे इतके हुशार झाले आहेत की ते तुम्हाला सहज फसवू शकतात.”
हे देखील वाचा : इर्शाळवाडीतील ग्रामस्थांच्या मदतीसाठी सरसावली जुई, केले मदतीचे आवाहन