शुक्रवार, मे 9, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘सेलिब्रिटी मास्टर शेफ’मध्ये आल्यानंतर ढसाढसा रडू लागली दीपिका कक्कर, प्रेक्षकांनी ढोंगी म्हणून हिणवलं, म्हणाले, “ओव्हर ॲक्टिंग…”

Shamal Sawantby Shamal Sawant
जानेवारी 6, 2025 | 3:14 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
dipika kakar getting trolled

दीपिका कक्करला केले ट्रोल

सध्या ‘सोनी टीव्ही’वरील ‘सेलिब्रिटीज् मास्टरशेफ’ हा कार्यक्रम सुरु होणार आहे. गेले अनेक दिवस या कार्यक्रमाचे अनेक प्रोमो समोर येत आहेत. अनेक दिवसांपासून या कार्यक्रमाचे चित्रीकरण सुरु आहे. यातील आता एक भाग बघायला मिळाला आहे. नुकत्याच एका प्रोमोमध्ये अभिनेत्री दीपिका कक्कर दिसून येत आहे. यामध्ये ती जेवणदेखील बनवताना दिसत आहे. यावेळी दीपिकाने एक पदार्थ तयार केला आहे. तिने बनवलेला पदार्थ चाखून शेफ विकास खन्ना यांची प्रतिक्रिया बघायला मिळत आहे. या प्रतिक्रियेनंतर दीपिका रडू लागली. त्यानंतर शोमध्ये असणाऱ्या इतर महिलादेखील रडू लागल्या. मात्र या सगळ्यानंतर नेटकऱ्यांनी दीपिकाला ट्रोल केले आहे. (dipika kakar getting trolled)

दरम्यान समोर आलेल्या प्रोमोमध्ये दीपिका एक डिश बनवताना दिसत आहे. तेव्हा तिच्या इथे रणवीर ब्रार व विकास खन्ना येतात आणि ती मागे राहिल्याचे सांगतात. दीपिकाकडे दुसरा प्लॅन आहे का? असंही विचारतात. त्यावर दीपिका म्हणते की, “होईल अशी आशा आहे”. नंतर ती प्लेटिंग करते आणि क्रीम ब्रुली टार्ट परीक्षकांसमोर ठेवते. नंतर परीक्षक तिने बनवलेला पदार्थ चाखतात आणि विकास तिला बघून म्हणतो, “बस्स झालं”. हे ऐकून दीपिका रडू लागते. त्यानंतर फराह तिला रडण्याचे कारण विचारते. त्यावर दीपिका म्हणते की, “मी आज त्या महिलेचं प्रतिनिधीत्व करत आहे जीला ती फक्त किचनमध्ये काम करते असं म्हणून दाबले जाते. हो आहे मी घरी जेवण बनवणारी बाई”.

आणखी वाचा – Video : रवी जाधव यांच्या नव्या घराची वास्तुशांती, इतकी मोठी आणि प्रशस्त आहे जागा, व्हिडीओमध्ये दिसली संपूर्ण झलक

View this post on Instagram

A post shared by Sony Entertainment Television (@sonytvofficial)

दीपिकाच्या या प्रसंगानंतर अर्चना गौतम,कविता, उषा नाडकर्णी यांच्यासहित सगळ्याच महिला रडू लागतात. नंतर फराह म्हणते की, “तुला जे ट्रोल करत आहेत त्यांना उत्तर मिळालं आहे”. दीपिकाचा हा व्हिडीओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी मात्र तिच्यावर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे. एका नेटकऱ्याने लिहीले की, “ज्या महिलेच्या घरात कुटुंबाच्या  सदस्यांपेक्षा अधिक मदत करणारी लोकं आहेत आणि ती म्हणतात मी होम कुक आहे. किती मस्त जोक केला आहे. ही फक्त रडून सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. मास्टर शेफची ट्रॉफी पण घेऊन जाईल”.

आणखी वाचा – Bigg Boss 18 लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार, ग्रँड फिनालेची तारीख जाहीर, कोण होणार विजेता?

तसेच अजून एकाने लिहिले की, “इथे पण नाटकं. आता ‘सोनी वाहिनी’ला मालिका बनवणार आहे ही”. अजून एकाने लिहिले की, “हे ससुराल सिमर का नाही. ओव्हरॲक्टिंग करणं बंद करा”. दरम्यान हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.     

Tags: Celebritydipika kakkarmaster chef
Shamal Sawant

Shamal Sawant

Latest Post

soldier duty over marriage
Social

हळद फिटली नसतानाही जवान लग्नाच्या तिसऱ्या दिवशी कामावर रुजू, आई-वडील भावुक तर पत्नीचा खंबीर पाठिंबा, मन हेलावणारा व्हिडीओ

मे 9, 2025 | 11:22 am
Akshay Kelkar Haldi Ceremony
Entertainment

सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याला लागली हळद, घरीच कुटुंबियांसह सेलिब्रेशन, मराठी कलाकारांची हजेरी

मे 9, 2025 | 10:56 am
Which Cooking Oil Is Good
Lifestyle

‘या’ तेलामुळे कोलेस्ट्रॉलचं प्रमाण अधिकाधिक वाढतंय, जेवणात कोणतं तेल वापरणं अधिक उत्तम?, डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार…

मे 8, 2025 | 7:00 pm
Video Viral From Pakistan
Social

“आम्ही भारताला थांबवूच शकलो नाही आणि…”, पाकिस्तान नागरिकाकडूनच भारताचा जयजयकार, पाक सैन्याचं सत्य समोर आणत…

मे 8, 2025 | 4:00 pm
Next Post
amir khan viral video

Video : कानात झुमके घालून कार्यक्रमासाठी गेला आमिर खान, नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली, म्हणाले, "मुलगी बनण्याची हौस…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.