शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

दिस सरले! हेमंत ढोमे-क्षिती जोग यांच्या लग्नाचा जुना Unseen Video व्हायरल, म्हणाला, “आमचं प्रेम…”

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 5, 2025 | 5:00 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
actor Hemant Dhome and actress Kshitee Jog unseen wedding video viral on social media

अभिनेता हेमंत ढोमे व अभिनेत्री क्षिती जोग यांच्या लग्नाचा जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय जोड्यांपैकी एक जोडी म्हणून अभिनेता हेमंत ढोमे आणि क्षिती जोग यांना ओळखले जाते. हेमंत व क्षिती यांनी २०१२ मध्ये एकमेकांबरोबर लग्नगाठ बांधली. मनोरंजनसृष्टीत काम करता करता ही जोडी एकमेकांच्या प्रेमात पडली आणि त्यांनी एकमेकांबरोबर लग्न करण्याचा निर्णय घेतला. आता त्यांच्या लग्नाला जवळपास १२ वर्षे पूर्ण झाली आहेत. हेमंत सध्या त्याच्या आगामी ‘फसक्लास दाभाडे’ या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे आणि यानिमित्ताने हेमंत ढोमेही चर्चेत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये तो व्यस्त आहे. हेमंत हा सोशल मीडियावर कायम सक्रीय असतो. सोशल मीडियावर तो आपळे फोटो व व्हिडीओ शेअर करत असतो. (Hemant Dhome and Kshitee Jog unseen wedding video)

अशातच हेमंतने नुकताच त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. ज्याची सर्वत्र चर्चा सुरू आहे. हा व्हिडीओ आहे हेमंत-क्षिती यांच्या लग्नाचा. हेमंतने त्याची पत्नी क्षिती जोगबरोबर लग्न लागतानाचे काही क्षण या व्हिडीओमधून शेअर केले आहेत. हेमंत-क्षिती यांच्या लग्नाला १२ वर्ष झाली आहेत आणि तरीही त्यांच्यातील प्रेम व मैत्री कायम टिकून असल्याचे मत हेमंतने अनेकदा मांडलं आहे. या खास व्हिडीओमधून त्याने लग्नातील जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.

View this post on Instagram

A post shared by Hemant Dhome | हेमंत ढोमे (@hemantdhome21)

आणखी वाचा – ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्रीने घेतली ‘ही’ महागडी कार, भावुकही झाली अन्…; व्हिडीओ व्हायरल

या व्हिडीओखाली हेमंतने असं म्हटलं आहे की, “व्हिडिओ जुना आहे पण गाणं नवं आहे. बाकी ते आमचं प्रेम कसं आहे वगैरे तुम्हाला माहितीच आहे” अशी खास पोस्ट केली आहे आणि या व्हिडीओला अनेक कलाकारांनी व चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे. सिद्धार्थ चांदेकर, अमेय वाघ, सायली संजीव यांसारख्या अनेक कलाकारांनी या व्हिडीओवर लाईक्स व कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे. तसेच अनेक चाहत्यांनीही या व्हिडीओला “एक नंबर जोडी”, “खूप छान”, “माझी आवडती जोडी” अशा अनेक कमेंट्स करत या प्रतिसाद दिला आहे.

आणखी वाचा – प्राजक्ता माळी प्रकरणी धनंजय मुंडेंनी प्रतिक्रिया का दिली नाही?, सुप्रसिद्ध अभिनेता म्हणाला, “मंत्री महोदय म्हणून…”

दरम्यान, क्षिती हेमंतपेक्षा ३ वर्षाने मोठी आहे. व्यावसायिक आयुष्यात तिची सुरुवात हेमंतच्या आधी झाली. १० डिसेंबर २०१२ मध्ये त्यांनी पुण्यामध्ये लग्न केले आणि खर्‍या अर्थाने संसाराला सुरुवात झाली. कलाक्षेत्र, आपापली कामं आणि घर या सगळ्याचा तोळ संभाळत हे दोघे त्यांचा संसार करत आहेत. लवकरच त्यांचा फसक्लास दाभाडे हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Tags: actor Hemant Dhome and actress KshiteeHemant Dhome and Kshitee weddingHemant Dhome and Kshitee wedding video
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Tharala tar mag serial fame Jui Gadkari answered the question of a fan if she was not an actress

"जर अभिनेत्री नसती तर?...", चाहत्याचा जुई गडकरीला थेट प्रश्न, जुई उत्तर देत म्हणाली, "मोठ्या ब्रँडमध्ये..."

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.