भाजप आमदार सुरेश धस यांनी काही दिवसांपूर्वी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर टीका करताना दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना, प्राजक्ता माळी यांची नावं घेतली होती. त्यांच्या या वक्तव्यानंतर प्राजक्ताने मुंबईत पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. राजकारणासाठी महिला कलाकारांच्या नावाचा गैरवापर होणं चुकीचं आहे त्यामुळे सुरेश धस यांनी माफी मागावी, अशी मागणी तिने केली. याशिवाय अभिनेत्रीने रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सहकुटुंब भेट घेऊन तक्रारीचं निवेदनही सादर केलं. याप्रकरणी मनोरंजन कलाविश्वातील अनेक कलाकारांनी प्राजक्ता माळीला पाठिंबा दिला. यात सचिन गोस्वामी, नितीन वैद्य, कुशल बद्रिके, मेघा धाडे व सुशांत शेलार यांचा समावेश होता. (sushant shelar on prajakta mali case)
सुशांत शेलार यांनी यावेळी प्राजक्ताचा फोटो शेअर करत तिच्यबद्दलची एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये अभिनेत्याने असं म्हटलं आहे की, “सगळ्या न्यूज चॅनल आणि सोशल मीडियावरती एका वाचाळवीराकडून ‘महाराष्ट्राच्या लाडक्या अभिनेत्री प्राजक्ता माळी’ यांच्याबद्दल जी खालच्या पातळीची टीका होत आहे, त्याचा मी कठोर शब्दांत निषेध करतो. अशा पद्धतीने कुठल्याही महिला कलाकाराला राजकारणात खेचून खालच्या पातळीवर टीका करणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही”. असं म्हटलं होतं.
अशातच सुशांत शेलार यांनी नुकतीच ‘इट्स मज्जा’च्या मज्जाचा अड्डावर हजेरी लावली होती. यावेळी त्यांना प्राजक्ता माळीने जशी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. तशी धनंजय मुंडे यांनी आपली भूमिका का स्पष्ट केली नाही. याबद्दल त्यांचं मत व्यक्त केलं. यावेळी सुशांत शेलार यांनी असं म्हटलं की, “आताची राजकीय परिस्थिती जी आहे त्यापेक्षा खूप मोठा विषय मार्गी लागणं ही तितकंच महत्त्वाचं आहे. प्राजक्ता माळीची बाजू आम्ही कलाकार व तिचे सहकलाकार म्हणून घेतली. किंवा या कुटुंबातील सदस्य म्हणून घेतली. तसंच बीडमधील संतोष देशमुखांचा प्रश्न मार्गी लागणेही महत्त्वाचे आहे”.
आणखी वाचा – ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्रीने घेतली ‘ही’ महागडी कार, भावुकही झाली अन्…; व्हिडीओ व्हायरल
यापुढे सुशांत शेलार यांनी असं म्हटलं की, “तसंच बीडमधील संतोष देशमुखांचा प्रश्न माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली मार्गी लागेलच. त्यामुळे मंत्री महोदय म्हणून धनंजय मुंडे त्या गोष्टी लवकर झाल्या पाहिजेत याकडे लक्ष देत आहेत आणि आम्ही कलाकार या विषयाबद्दल आमची भूमिका घेत आहोत. त्या देशमुखांना व त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळणं जास्त महत्त्वाचं आहे”.