71th National Film Awards : देशभरातील समृद्ध चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रतिष्ठेचा समजला जाणारा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आज दिनांक १ ऑगस्ट २०२५ रोजी जाहीर झाला. ७१ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्याकडं अवघ्या सिनेइंडस्ट्रीचं लक्ष लागलेलं होतं. अखेर हा दिवस हा आज आला आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून ज्या कलावंतांनी पुरस्कार जिंकले आहेत, त्यांची नावं जाहीर करण्यात आली. अनेकांचं स्वप्न असणाऱ्या या पुरस्काराची घोषणा करण्यात आली. यामध्ये हिंदी आणि मराठी चित्रपटानेही आपलं अढळ स्थान निर्माण केलं. ‘श्यामची आई’ या मराठी चित्रपटाने सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट हा पुरस्कार पटकावला. तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कारासाठी विक्रांत मेस्सीच्या नावाची घोषणा झाली, त्याला ‘१२ याशिवाय ‘जवान’ सिनेमासाठी शाहरुख खानलादेखील ‘सर्वोत्कृष्ट अभिनेता’ हा पुरस्कार देण्यात येणार आहे. शाहरुखचा हा पहिला राष्ट्रीय पुरस्कार आहे.फेल’ सिनेमासाठी हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री या पुरस्कारावर राणी मुखर्जीने नाव कोरले. राणीला ‘मिसेस चॅटर्जी विरुद्ध नॉर्वे’ या सिनेमासाठी हा पुरस्कार दिला जाणार आहे. सुदीप्तो सेन यांना ‘द केरला स्टोरी’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे.
७१ व्या राष्ट्राय चित्रपट पुरस्कार विजेत्यांची यादी खालीलप्रमाणे :
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन – केरला स्टोरी – सुदीप्तो सेन
सर्वोत्कृष्ट अभिनेता – शाहरुख खान (जवान ) आणि विक्रांत मॅसी (12th Fail)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – राणी मुखर्जी ( मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता – विजयराघवन ( पूक्कलम ) आणि मुथुपेटाई सोमू भास्कर (पार्किंग )
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – उर्वशी ( उल्लोझुक्कू ) आणि जानकी बोडीवाला (वश)
सर्वोत्कृष्ट बालकलाकार – सुक्रिती वेणी बंदरेड्डी, कबीर खंडाणे आणि त्रिशा ठोसर
सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी – प्रशांतनु महापात्रा ( द केरला स्टोरी )
सर्वोत्कृष्ट पटकथा – साई राजेश नीलम (बेबी) आणि रामकुमार बालकृष्ण (पार्किंग)
सर्वोत्कृष्ट संवाद लेखक – दीपक किंगराणी, सिर्फ एक बंदा काफी है
सर्वोत्कृष्ट संवाद लेखक – दीपक किंगराणी, सिर्फ एक बंदा काफी है
सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन डिझाईन – मोहनदास (२०१८)
सर्वोत्कृष्ट अॅक्शन कोरिओग्राफी – हनु-मॅन (तेलुगू)
सर्वोत्कृष्ट मेकअप आर्टिस्ट – श्रीकांत देसाई (सॅम बहादूर)
सर्वोत्कृष्ट वेशभूषा – सचिन लोवळेकर, दिव्या आणि निधी गंभीर (सॅम बहादूर )
सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शन – वाथी (तामिळ)
सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत – Animal Movie हर्षवर्धन रामेश्वर
सर्वोत्कृष्ट गीत – बालगम (द ग्रुप)
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक – पीव्हीएम एस रोहित (प्रेमिथुन्ना)
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका – शिल्पा राव (Chaliya, जवान )
सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शन – ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’मधीस धिंडोरा बाजे गाण्यासाठी- वैभवी मर्चेंट
सर्वोत्कृष्ट साउंड डिझाईन – सचिन सुधाकरन आणि हरिहरन मुरलीधरन – Animal
सर्वोत्कृष्ट अॅक्शन दिग्दर्शन – हनु-मॅन (तेलुगू)
सर्वोत्कृष्ट संपादन – मिधुन मुरली ( पुक्कलम ) सर्वोत्कृष्ट आसामी चित्रपट – रोंगाटापू 1982
सर्वोत्कृष्ट बंगाली चित्रपट – डीप फ्रिज
सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट – कथल: अ जॅकफ्रूट मिस्ट्री
सर्वोत्कृष्ट कन्नड चित्रपट – कंदीलू- द रे ऑफ होप
सर्वोत्कृष्ट मल्याळम चित्रपट- उल्लोझुक्कू
सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट – श्यामची आई
सर्वोत्कृष्ट Odia चित्रपट – पुष्करा
सर्वोत्कृष्ट पंजाबी चित्रपट – Godday Godday Chaa
सर्वोत्कृष्ट तामिळ चित्रपट – पार्किंग
सर्वोत्कृष्ट तेलुगू चित्रपट – भगवंत केसरी
सर्वोत्कृष्ट गुजराती चित्रपट – वश





