शुक्रवार, एप्रिल 17, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

वयाच्या ४२व्या वर्षी सुप्रसिद्ध अभिनेत्री झाली आई, दुसऱ्यांदा केले चिमुकल्या बाळाचे स्वागत, शेअर केली खास पोस्ट

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
सप्टेंबर 3, 2025 | 3:22 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
 gauhar khan blessed with boy

वयाच्या ४२व्या वर्षी सुप्रसिद्ध अभिनेत्री झाली आई, दुसऱ्यांदा केले चिमुकल्या बाळाचे स्वागत, शेअर केली खास पोस्ट

gauhar khan blessed with boy : अभिनेत्री गौहर खान आणि झैद दरबार यांच्या घरी आनंदाचे वातावरण पसरले आहे. गौहर खान वयाच्या ४२ व्या वर्षी आई झाली आहे. आधीपासून हे जोडपे एका मुलाचे पालक होते आणि आता ते दुसऱ्यांदा पालक बनले आहेत. या जोडप्याने दुसऱ्यांदा बेबी बॉयचे स्वागत केले आहे. या जोडीने चाहत्यांना इन्स्टाग्रामवर एकत्रित पोस्ट करुन ही चांगली बातमी दिली आहे. गौहर आणि झैद यांनी १ सप्टेंबर रोजी त्यांच्या दुसर्‍या मुलाचे स्वागत केले. त्याच वेळी, या जोडीने दोन दिवसानंतर म्हणजे ३ सप्टेंबर रोजी मंगळवारी त्यांच्या मुलाच्या जन्माची घोषणा केली.

ही आनंदाची बातमी देणाऱ्या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले की, “बिस्मिल्लाह हिर रहमान निर रहीम झेहान १ सप्टेंबर २०२५ रोजी जन्मलेल्या आपल्या नवीन बाळ भावाबरोबर आपले राज्य शेअर करण्यास खूप आनंदित आहे. आमच्या कुटुंबासाठी प्रत्येकाचे सतत प्रेम आणि आशीर्वाद मिळावे अशी शुभेच्छा. जैद आणि गौहर”. जेहानच्या धाकट्या भावाचा जन्म १ सप्टेंबर २०२५ रोजी झाला. सर्वांनी आमच्या बाळाला प्रेम व आशीर्वाद द्यावे असं गौहरने शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे.

आणखी वाचा – सासऱ्यांचीही लाडकी होती प्रिया मराठे, अभिनेत्रीच्या निधनानंतर ‘ती’ पोस्ट होतेय व्हायरल, कसा होता बॉण्ड?

View this post on Instagram

A post shared by Gauahar Khan (@gauaharkhan)

जोडप्याच्या या पोस्टनंतर, चाहते त्यांचे खूप अभिनंदन करीत आहेत. सर्व सेलिब्रिटीज पालक झाल्याबद्दल गौहर आणि जैद यांचे अभिनंदन करीत आहेत. गायक नीती मोहन यांनी लिहिले, “ओएमजी! ही बातमी ऐकून आम्हाला खूप आनंद झाला. तुमचे आणि विशेषत: झेहानचे अभिनंदन”. चाहत्यांनी आणि इंडस्ट्रीतील जवळच्या लोकांनी कमेंट्समध्ये तिच्यावर प्रेमाचा वर्षाव केला आहे, अदिती गोवित्रीकर, अमित टंडन, दिया मिर्झा, सौंदर्या शर्मा यांनी गौहरच्या पोस्टवर कमेंट करुन तिचं व जैदचं अभिनंदन केलं आहे.

आणखी वाचा – उमेश कामतचा नव्या घरातील पहिला गणेशोत्सव, प्रिया मोदक करताना दिसली स्वयंपाकघराची झलक, हॉलही आहे प्रशस्त

गौहर आणि जैद दरबार यांनी सन २०२० मध्ये लग्न केले. लग्नाच्या तीन वर्षानंतर, सन २०२३ मध्ये या जोडीने त्यांचा मोठा मुलगा झेहानचे स्वागत केले. आता हे जोडपे दुसर्‍या मुलाचे पालक झाले आहेत.

Tags: gauhar khangauhar khan baby boyzaid darbar
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

patralekhaa body shamed
Entertainment

मुलाला जन्म दिला, दोन चित्रपटांची निर्मिती आणि…; बॉडी शेमिंग करताच भडकली अभिनेत्री, म्हणाली, “माझे वजन…”

एप्रिल 17, 2026 | 5:11 pm
Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Chahatt Khanna divorce
Entertainment

लग्नासाठी धर्म बदलला, घटस्फोट घेतला आणि…; सततच्या ट्रोलिंगवर अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, “मला जबरदस्ती…”

एप्रिल 17, 2026 | 12:10 pm
Next Post
priya umesh new home

उमेश कामतचा नव्या घरातील पहिला गणेशोत्सव, प्रिया मोदक करताना दिसली स्वयंपाकघराची झलक, हॉलही आहे प्रशस्त

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.