शनिवार, एप्रिल 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

मेष व मिथुन राशीच्या लोकांसाठी उद्याचा दिवस फलदायी, तर वृषभ व कन्या राशीच्या लोकांना शारीरिक त्रास सहन करावा लागणार

Majja Webdeskby Majja Webdesk
एप्रिल 20, 2024 | 7:30 pm
in Trending
Reading Time: 1 min read
google-news
21 april 2024 panchang mesh to meen rashi bhavishya see the details

मेष व मिथुन राशीच्या लोकांसाठी उद्याचा दिवस फलदायी, तर वृषभ व कन्या राशीच्या लोकांना शारीरिक त्रास सहन करावा लागणार

मेष : उद्या जे काही काम कराल त्यात उत्साह राहील. शारीरिक व मानसिक ताजेपणा राहील. कुटुंबात सुख-शांती नांदेल. मित्र आणि नातेवाईकांबरोबर आनंदाचे क्षण घालवू शकाल. प्रवासाची शक्यता आहे. व्यापारात मोठी गुंतवणूक करू नका. आर्थिक हानी होईल. दुसऱ्यावर अति विश्वास ठेवू नका. आर्थिक लाभ, स्वादिष्ट भोजन आणि भेटवस्तू यामुळे तुमचा दिवस चांगला जाईल.

वृषभ : उद्याचा दिवस तुमच्यासाठी शुभ नाही. तुम्हाला अनेक प्रकारच्या चिंता असू शकतात. शारीरिक स्वास्थ्यही चांगले राहणार नाही. नातेवाईक आणि प्रियजनांशी वाद होऊ शकतात. आजची अनेक कामे अपूर्ण राहू शकतात. काही कारणाने खर्चही जास्त होईल. एखाद्या गोष्टीबद्दल गैरसमज होऊ शकतो.

मिथुन : व्यापारी वर्गासाठी उद्याचा दिवस शुभ आहे. व्यवसाय आणि उत्पन्नात वाढ होईल. तुमच्या नोकरीत तुमच्या अधिकाऱ्यांच्या आशीर्वादामुळे तुम्हाला पदोन्नतीदेखील शक्य आहे. अंगीभूत कला गुणासाठी चांगले वातावरण राहिल. बौद्धिक क्षेत्रातील व्यक्तींना मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. 

कर्क : आज सामाजिक कामात मान सन्मान मिळण्याचे योग आहेत. कामात यश मिळाल्याने आनंदी राहाल. व्यापारात उत्पन्नात वाढ होईल. कायदेशीर बाबी पूर्ण करा. विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणाची संधी मिळू शकते. नवीन व्यापार प्रारंभ करण्यासाठी यशस्वी दिवस आहे. काहींना प्रमोशन व वेतनवाढ मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक सुधारणा झाल्याने मनासारखा खर्च कराल.

सिंह : राजकीय सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. नोकरी व्यापारात आर्थिक लाभाची शक्यता आहे. कुटुंबावर खर्च होईल. आर्थिकदृष्ट्या प्रवास लाभदायक ठरतील. राजकीय कलाक्षेत्रातील व्यक्तींना पद प्रतिष्ठा लाभेल. आपल्या हातून चांगले कार्य कार्य घडेल. एखादी महत्वाची पण विलंबाने झालेली कृती फायद्याची जाणवेल.

कन्या : आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक पातळीवर काही समस्या उद्भभवतील. मानसिक स्वास्थ बिघडणार नाही याबाबत काळजी घ्यावी लागेल. अनावश्यक कामात वेळ वाया घालवू  नका. कामचुकारपणा करू नका. मागील काही आठवणींमुळे दुखः होईल. शक्यतो प्रवास टाळा. अपघात दुघर्टना घडण्याची शक्यता आहे.

तूळ : व्यापारात नवीन योजनेत भागीदाराकडून मदन मिळेल. व्यवसाय आणि उत्पन्नात वाढ होईल. मित्रांकडून तुम्हाला फायदा होईल. बांधकाम क्षेत्रातील व्यक्तींसाठी भरभरटीचा दिवस आहे. एखाद्या विधायक कार्याची मुहूर्तमेढ रोवली जाईल. नवीन प्रकल्प कामे पुर्णात्वास जातील. आरोग्य उत्तम राहील.

वृश्चिक : नोकरीत विरोधकावर लक्ष ठेवा. रोजगारात प्रतिस्पर्धी डोईजड होतील. आपल्या कार्यक्षेत्रात अडचणी समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. व्यसनापासून सावध रहा. मोठे व्यवहार उलाढाली यात फसगत होईल. आरोग्याबाबतीत विशेष काळजी घ्यावी लागेल. घरातील वातावरण बिघणार नाही याकडे लक्ष द्यावे.

धनू : अनावश्यक चिंतेपासून दूर राहा. देणे-घेणे सावधानता बाळगा. नोकरीत आलेली समस्या आपल्या प्रयत्नामुळे दूर होईल. व्यापार-व्यवसायात दिवस फायदेशीर राहिल. मुलांच्या बाबतीत शारिरिक समस्या निर्माण होतील. व्यापारात नविन योजना आखाल त्या फायदेशीर ठरतील. घरगुती वातावरण चांगले राहिल. सकारात्मक दृष्टीकोन ठेवा.

मकर : उद्या आपल्या हातून विशेष काम होण्याचे योग आहेत. आर्थिक बाबतीत फायदयाचे दिनमान आहे. व्यापारात गुंतवणुक कायदेशीर ठरेल. अपेक्षेपेक्षा अधिक लाभ होईल. धनसंचयात वाढ होईल. काहींना अचानक धनलाभाचा संधी मिळेल. संशोधन क्षेत्रातील व्यक्तींना लाभ होतील. समाजकारणात प्रतिष्ठा वाढेल.

कुंभ : उद्या आर्थिक स्थिती चांगली राहिल. कलाक्षेत्रातील व्यक्तींसाठी उत्तम दिवस आहे. लेखकवर्गास साहित्यिक क्षेत्रात किर्ती व मानसन्मान मिळेल. हातून विधायक कार्य घडेल. अतिरिक्त कामानुन उत्तम मोबदला मिळण्याची शक्यता आहे. बौद्धिक आणि शैक्षणिक कार्यात मान सन्मान मिळेल. स्थावर मालमत्तेची विक्री करताना घाईगडबड करू नका.

मीन : नव्या योजना कार्यान्वित करु शकाल. नोकरी व्यवसायात भरभराट होण्याची शक्यता आहे. आर्थिक उन्नती करणारा दिवस ठरेल. प्रतिष्ठा वृद्धिंगत होईल.राजकीय क्षेत्रातील व्यक्तींकडून सहकार्य लाभेल.विद्वान लोक भेटतील. कौटुंबिक समाधान लाभल्यामुळे मन प्रसन्न रहिल

Tags: 21 April HoroscopeHoroscope Marathi NewsToday's Horoscope Marathi News
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
how sleep can impact heart health
Lifestyle

झोपेच्या कमतरतेमुळे डायबिटीस, हृदयविकार, लठ्ठपणा, मानसिक समस्यांचा धोका वाढतो, जाणून घ्या यावर उपाय…

एप्रिल 18, 2026 | 11:50 am
Next Post
Famous Foreigner Villains in Bollywood

अमिताभ बच्चन, संजय दत्त यांच्यासह एकेकाळी गाजलेले भारतीय वंशावळीचे 'हे' व्हिलन तुम्हाला माहीत आहेत का?, पाहा या फॉरेनर दिसणाऱ्या भारतीय खलनायकांची रंजक माहिती

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.