बॉलीवूडमध्ये कोण, कधी, कसं चर्चेत येईल हे सांगता येत नाही. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री पूनम पांडेदेखील अशीच चर्चेत आली. पूनमने काही दिवसांपूर्वी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन सर्वाइकल कॅन्सरमुळे मृत्यू झाल्याची पोस्ट शेअर केली होती. तिच्या पोस्टमुळे तिच्या चाहत्यांना चांगलाच धक्का बसला. पण दुसऱ्या दिवशी तिने हा प्रकार कॅन्सरबाबत जनजागृती करण्यासाठी केल्याचे स्वतः कबूल केले. अभिनेत्रीच्या या वागण्यामुळे सर्वच स्तरातून तिच्यावर टीका होऊ लागली. खोट्या मृत्यूच्या प्रकारामुळे आता पूनम व तिचा पती सॅम बॉम्बे अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. या दोघांच्या विरोधात मानहानीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Poonam pandey news)
सतत बोल्ड व हटके लूकसाठी चर्चेत असलेल्या पूनम पांडेने केलेल्या कृत्याबद्दल अनेकांची मनं दुखावल्यामुळे मुंबईत राहणाऱ्या फैजान अन्सारीने तिच्या विरोधात १०० कोटी रुपयांचा मानहानीचा गुन्हा दाखल केला आहे. फैजान अन्सारीने त्याच्या तक्रारीमध्ये पूनम व तिचा पती सॅमवर आरोप केले आहेत. खोटी प्रसिद्धी मिळवण्यासाठी कॅन्सरसारख्या गंभीर आजाराचा आधार घेतला व मृत्यूचे खोटं नाटक केलं असल्याचं त्याने या आरोपांद्वारे म्हटलं आहे. पूनमच्या या कृत्यामुळे अनेकांच्या भावना दुखावल्या आहेत. तसेच काहींच्या विश्वासालादेखील तडा गेला आहे, यामुळे प्रतिमा खराब झाली आहे, असे तक्रारीत म्हटले आहे.
आणखी वाचा – प्रसिद्ध दिग्दर्शक प्रकाश कोलेरी यांचं निधन, राहत्या घरात मृतावस्थेत आढळले
याबरोबरच फैजानने स्वतः सिव्हिल लाईन्स कानपूर कोर्टात जाऊन पूनम व तिच्या पतीविरुद्ध १०० कोटींचा गुन्हा दाखल केला असल्याचे सांगितले. यापुढे कोणत्याही गंभीर आजाराचा स्वतःच्या प्रसिद्धीसाठी वापर करु नये असे देखील फैजानचे म्हणणे आहे. त्याने दाखल केलेल्या तक्रारीमध्ये पूनम व सॅमला लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी देखील केली आहे.
पूनम सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असून चाहत्यांशीदेखील संपर्क साधत असते. ती सोशल मीडियावर अनेकदा आक्षेपार्ह विधाने करत असते. पूनमने शेअर केलेले तिचे बोल्ड फोटो हा एक नेहमी चर्चेचा विषय ठरला.