शनिवार, जुलै 25, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

राम मंदिरावरुन शिल्पा शेट्टींने मोदींसाठी लिहिले खास पत्र, म्हणाली, “काही जण इतिहास वाचतात, तुम्ही…”

Majja Webdeskby Majja Webdesk
फेब्रुवारी 14, 2024 | 6:15 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
shilpa shetty letter to PM Modi

राम मंदिरावरुन शिल्पा शेट्टींने मोदींसाठी लिहिले खास पत्र, म्हणाली, "काही जण इतिहास वाचतात, तुम्ही..."

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या एका खास पत्रामुळे ती चर्चेत आली आहे. २२ जानेवारी रोजी पार पडलेल्या राम मंदिराच्या विशेष सोहळ्याचे औचित्य साधून तिने हे कौतुकाचे पत्र लिहिले आहे. या पत्रामध्ये “प्रत्येक भारतीयाचे स्वप्न तुमच्यामुळे साकार झाले असून याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत” असं म्हटलं आहे. शिल्पा शेट्टीचे हे पत्र भारतीय जनता पक्ष (महाराष्ट्र) च्या एक्सद्वारे (पूर्वीचे ट्विटर) शेअर करण्यात आले आहे. शिल्पाने या पत्रामध्ये मोदीजींचे अयोध्या मंदिरासाठी आभार मानले आहेत.(shilpa shetty letter to PM Modi)

वर्षाच्या सुरुवातीलाच ऐतिहासिक राममंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. विविध क्षेत्रातील अनेक दिग्गज लोकांनी या सोहळ्याला हजेरी लावली होती. देशातील प्रत्येक रामभक्त हा सोहळा साजरा करत होता. त्यामुळे लोकांच्या भावना गहिवरून आल्या होत्या. प्रत्येक भारतीयाची ही भावना लक्षात घेता शिल्पाने मोदीजींना आभारपूर्वक असे पत्र लिहिले. या पत्राद्वारे तिने असं म्हटलं आहे की, ” आदरणीय मोदीजी, काही लोक इतिहास वाचतात. काही लोक इतिहासातून शिकतात. पण तुमच्यासारखे लोक इतिहास बदलतात’. तुम्ही रामजन्मभूमीचा ५०० वर्षांचा इतिहास बदलला आहे. त्यासाठी मनापासून धन्यवाद. तुमच्या या शुभकार्याने तुमचे नाव भगवान श्रीरामाच्या नावाशी कायमचे जोडले गेले आहे. नमो राम! जय श्री राम!”

आणखी वाचा – आली लग्नघटिका समीप! रकुल प्रीत सिंग व जॅकी भगनानी गोव्यातील ‘या’ आलिशान हॉटेलमध्ये करणार शाही विवाहसोहळा, जय्यत तयारी सुरु

शिल्पाच्या या पत्रामुळे इतरांनीदेखील पंतप्रधान मोदी यांचे आभार मानले आहेत. भारतात मोदी सरकारमुळे अनेक सकारात्मक बदल झाले आहेत. आगामी काळात देखील मनोरंजन, अध्यात्म, व्यवसायासाठी अनेक संधी उपलब्ध होतील अशा सर्वांनाच आशा आहेत. राममंदिराचा विषय हा अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. आयोध्येमध्ये रामाचे मंदिर असावे असे सर्वांचेच मत होते. २०१९ ला राममंदिराच्या बाजूने निकाल लागल्यानंतर मंदिर बांधकामास सुरुवात झाली व सरतेशेवटी २२ जानेवारी २०२४ रोजी मंदिराचे लोकार्पण करण्यात आले.

आणखी वाचा- ‘सिंघम अगेन’ चित्रपटातील अर्जुन कपूरचा खतरनाक लूक आला समोर, दिसणार ‘या’ खास भूमिकेत

या सोहळ्याला अरुण गोविल, सुनील लाहिरी, दीपिका चिखलिया, अमिताभ बच्चन, रजनीकांत, अभिषेक बच्चन, रणबीर कपूर, आलिया भट्ट, विक्की कौशल, कतरिना कैफ, अनुपम खेर, विवेक ओबेरॉय, हेमा मालिनी, रोहित शेट्टी, माधुरी दीक्षित नेने, राजकुमार हिरानी, कैलाश खेर, राम चरण, मनोज जोशी यांसह अनेक कलाकार उपस्थित होते.

Tags: aayodhyanarendra modipm narendra modiram mandirshipla shetty
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Pach Futacha Bachchan Marathi Movie
Entertainment

‘पाच फुटाचा बच्चन’ चा दैदीप्यमान प्रवास : कीर्तन, संस्कृती आणि संघर्षाची प्रेरणादायी कथा

जुलै 25, 2026 | 2:00 pm
Shekhar Suman On Student Protest
Entertainment

तीन दिवस झोप नाही, रडत आहे आणि…; आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जमुळे प्रसिद्ध अभिनेत्याला दुःख, म्हणाला…

जुलै 25, 2026 | 12:45 pm
Eva grover husband hyder ali khan
Entertainment

दिग्दर्शकासह शरीरसंबंध ठेवण्यास जबरदस्ती आणि…; नवऱ्याबाबत सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, म्हणाली, “पैशांसाठी…”

जुलै 25, 2026 | 11:00 am
Akanksha Chamola Gaurav Khanna Lock Upp 2
Entertainment

Lock Upp 2 : गौरव खन्नाची कुत्र्याशी तुलना करणं पत्नीला पडलं भारी, नेटकरी भडकले, म्हणाले, “घटस्फोट दे…”

जुलै 25, 2026 | 9:50 am
Next Post
Prakash Koleri Death

प्रसिद्ध दिग्दर्शक प्रकाश कोलेरी यांचं निधन, राहत्या घरात मृतावस्थेत आढळले

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.