बुधवार, एप्रिल 15, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“हिंदीची कॉपी का केली?”, तेजश्री प्रधानच्या नव्या मालिकेच्या प्रोमो पाहून नेटकऱ्यांच्या कमेंट्स, म्हणाले, “ओरिजिनल असं…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जून 25, 2025 | 4:00 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Zee Marathi Tejashri Pradhan New Serial

"हिंदीची कॉपी का केली?", तेजश्री प्रधानच्या नव्या मालिकेच्या प्रोमो पाहून नेटकऱ्यांच्या कमेंट्स, म्हणाले, "ओरिजिनल असं…"

Zee Marathi Tejashri Pradhan New Serial : ‘झी मराठी’ वाहिनीवर आलेल्या ‘वीण दोघांतली ही तुटेना’ या नव्या मालिकेच्या प्रोमोने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. या नव्याकोऱ्या मालिकेतून मालिका आणि चित्रपटविश्वातील दोन लोकप्रिय चेहरे प्रेक्षकांच्या मनात घर करायला सज्ज झाले आहेत. अभिनेत्री तेजश्री प्रधान आणि अभिनेता सुबोध भावे ही जोडी या मालिकेतून मालिकाविश्व गाजवायला सज्ज झाली आहे. मालिकेच्या प्रसारणाची वेळ अद्याप समोर आलेली नाही, मात्र ही मालिका लवकरच सिनेरसिकांच्या भेटीस येणार आहे. मालिकेच्या समोर आलेल्या पहिल्याच प्रोमोने मालिकेप्रती उत्सुकता वाढविली आहे.

‘वीण दोघांतली ही तुटेना’ या मालिकेत तेजश्री ‘स्वानंदी’ तर, सुबोध ‘समर’ ही भूमिका साकारताना दिसणार आहेत. प्रेक्षकांना समर आणि स्वानंदीची अनोखी प्रेमकहाणी या मालिकेतून पाहायला मिळणार आहे. समोर आलेल्या प्रोमोमध्ये दोघांची आलिशान रेस्टारंटमध्ये भेट होते. आपल्या भावा-बहिणीचं लग्न कुठे होईल, कसं होईल याबाबत ते चर्चा करताना दिसत आहेत. पण, यादरम्यान स्वतःच्या लग्नाबद्दल ते काहीच ठरवत नाहीत. स्वानंदी तिच्या भावाच्या सुखासाठी समरशी लग्न करण्याचा निर्णय घेते. तर, समर बहिणीसाठी स्वानंदीशी लग्न करणार असल्याचं प्रोमोवरुन समजतंय.

आणखी वाचा – मालिकेत अपघात, मृत्यूचा सीन शूट होताना कलाकारावर नारळ ओवाळून काढतात नजर, मराठी अभिनेत्रीने दाखवलं सत्य

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

मालिकेचा प्रोमो पाहताच प्रेक्षकांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे. तर काहींनी मालिकेला हिंदी मालिकेची कॉपी असल्याचं म्हणत ट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे. थेट कमेंटमध्ये या मालिकेचा नवा प्रोमो पाहून मालिकेला ट्रोल केलं जातं आहे. “फायनली ‘बड़े अच्छे लगते है’चा मराठी रिमेक आला”, “सिरीयल बडे अच्छे लगते है, संगीत खुलता कळी खुलेना, ओरिजिनल काही आहे का?” “ही मालिका ‘बड़े अच्छे लगते है’ सीरियलचा रिमेक वाटतेय पण, तेजश्री असल्याने आम्ही ही मालिका जरुर पाहणार”, “मालिका भलेही रिमेक असूदेत पण कलाकार खरंच खूप चांगले घेतले आहेत त्यामुळे आपण मालिकेला सपोर्ट केलं पाहिजे”, “बड़े अच्छे लगते है मराठीमध्ये आलेली दिसत आहे”, “हिंदीची कॉपी का केली?” अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी या प्रोमोवर केल्या आहेत.

आणखी वाचा – पत्नीनेच केली गोविंदाची पोलखोल, ‘अवतार’ चित्रपटाबाबत खोटं बोलणं पडलं महागात, सुनीता अहुजा म्हणाली, “गोविंदाबरोबर ४० वर्षे झाली”

प्रोमोला मिलियन व्ह्यूज असूनही मालिकेचा प्रोमो पाहून मालिका ट्रोल होत आहे. अनेकांनी आपला ओरिजिनल कंटेंट का नाही असा सवाल केला आहे. दरम्यान, किती काही असलं तरी तेजश्री व सुबोधचा असलेला मोठा फॅन या मालिकेची आतुरतेने वाट पाहत आहे.

Tags: marathi serialNew Serial trollzee marathi
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bapya Marathi Movie Songs
Entertainment

‘कारट्या’ची धूम, ‘बाप्या’च्या युथफुल रॅप साँगचा सोशल मीडियावर धुमाकूळ, सिनेमॅटिक शूट लक्षवेधी

एप्रिल 14, 2026 | 4:46 pm
Alia Bhatt Has Opened Up About Motherhood
Entertainment

आलिया भट्टच्या तीन वर्षीय मुलीला वाटते अपयशाची भीती, सद्गुरुंना विचारलं, “मी चांगली आई आहे का?”

एप्रिल 14, 2026 | 2:24 pm
Abhishek Bachchan 0n IPL
Entertainment

“ते माझ्या बजेटच्या बाहेर होतं”, अभिषेक बच्चनने IPL मध्ये कोणताही संघ न खरेदी करण्यामागचे सांगितलं कारण, म्हणाला, “खूप महाग…”

एप्रिल 14, 2026 | 1:10 pm
Digambar Naik Controversy
Entertainment

‘दशावतार’ चित्रपटात दिगंबर नाईक पाहिजे होता?, अभिनेत्याने व्यक्त केली खंत, म्हणाले, ” मालवणी माणूस नको…”

एप्रिल 14, 2026 | 12:21 pm
Next Post
pandharpur wari 2025 sharvari jog

स्वतःच्या हाताने भाकऱ्या थापून वारकऱ्यांच्या सेवेत लोकप्रिय अभिनेत्री दंग, दिवेघाट ते सासवड पायवारीही केली, नेटकऱ्यांकडून कौतुक

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.