शुक्रवार, जुलै 24, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

दिव्यांका त्रिपाठीचा वेस्टर्न स्टाईल Baby Shower, सिनेविश्वातील कलाकारांची खास हजेरी, नवऱ्याचा जबरदस्त डान्स आणि…

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
एप्रिल 6, 2026 | 11:55 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Divyanka Tripathi Baby Shower

दिव्यांका त्रिपाठीचा वेस्टर्न स्टाईल Baby Shower, सिनेविश्वातील कलाकारांची खास हजेरी, नवऱ्याचा जबरदस्त डान्स आणि...

Divyanka Tripathi Baby Shower : टेलिव्हिजनची ‘ईशी मां’ म्हणजेच दिव्यांका त्रिपाठी दहिया लवकरच आई होणार आहे. काही दिवसांपूर्वीच तिने ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती. यानंतर अभिनेत्रीच्या डोहाळ जेवणाकडे साऱ्यांचं लक्ष लागून राहिलं होतं. अखेर दिव्यांकाच्या डोहाळ जेवणाचे खास फोटो समोर आले आहेत. ज्याचे फोटो तिच्या सिनेविश्वातील मित्रांनीही शेअर केले आहेत. या बेबी शॉवरमध्ये दिव्यांका खूपच क्यूट दिसत होती. तसेच या बेबी शॉवर पार्टीला टीव्ही इंडस्ट्रीतील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती. दिव्यांकाने तिच्या बेबी शॉवरमध्ये पांढऱ्या रंगाचा फ्लोय गाऊन घातला होता. ज्यामध्ये ती खूपच क्यूट दिसत होती. या गाउनसह, अभिनेत्रीने तिचे केस अर्धे पिन केले आणि केस खाली मऊ कर्लमध्ये ठेवले. तर, दागिने म्हणून तिने ऑक्सिडाइज इअररिंग्जला पसंती दर्शविली. लाल रंगाच्या लिपस्टिकमध्ये अभिनेत्री खूपच गोंडस दिसत होती. आणि मॅटर्निटी ग्लोही तिच्या चेहऱ्यावर पाहायला मिळाला.

या बेबी शॉवर फंक्शनमध्ये अनेक खेळही खेळले गेले. त्यातील काही व्हिडीओ दिव्यांकाच्या मित्रांनी शेअर केले आहेत. यातील एका खेळात नवऱ्यांचे हात बांधले जातात आणि बायकांना चेंडू मागे टाकावा लागला. हा गेम धीरज धूपर आणि विनी अरोरा धूपर यांनी जिंकला होता, या दोघांनीही त्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. याशिवाय टू बी फादर म्हणजेच विवेक दहियानेही या फंक्शनमध्ये धमाकेदार डान्स केला. तर दिव्यांकाही तिथे डान्स करताना दिसली. या बेबी शॉवर फंक्शनला दिव्यांकाच्या टीव्ही इंडस्ट्रीतील मित्रांनी हजेरी लावली होती. ज्यामध्ये त्याच्या सर्वात लोकप्रिय मालिका ‘ये है मोहब्बतें’ ची संपूर्ण स्टार कास्ट देखील सहभागी झाली होती. या सर्वांनी डान्स करत कार्यक्रमाची शोभा वाढविली. या कार्यक्रमात शिरीन मिर्झा, नीना कुलकर्णी, दिव्यांकाची ऑनस्क्रीन मुलगी रुहानिका धवन हिनेही हजेरी लावली होती. याशिवाय श्रद्धा आर्या, एकता कपूर, संदीप सिकंद अशा अनेक इंडस्ट्रीतील नावांचा समावेश होता.

आणखी वाचा – गौरव मोरेने गुपचूप केलं लग्न, ऋतुजा बागवेने दाखवली बायको, फोटो तुफान व्हायरल

View this post on Instagram

A post shared by Vinny Arora Dhoopar (@vinnyaroradhoopar)

दिव्यांका आणि विवेक लग्नाच्या १० वर्षानंतर आई-वडील होणार आहेत. दोघांनी जुलै २०१६ मध्ये भोपाळमध्ये लग्न केले. दोघेही ‘ये है मोहब्बतें’च्या सेटवर भेटले होते. येथूनच त्यांचे प्रेम फुलले आणि दोघांनी लग्न केले. आता दोघेही लवकरच आई-वडील होणार आहेत आणि यासाठी दोघेही खूप उत्सुक आहेत. दोघे जुळ्या मुलांचे पालक होणार असल्याचीही बातमी आहे. या दोघांनी अनेक महिने पालक होणार असल्याची ही बातमी लपवून ठेवली होती. काही दिवसांपूर्वीच ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर करण्यात आली होती.

Tags: Divyanka tripathiDivyanka Tripathi Baby Showertelevision actress
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bhootam Bhayam
Entertainment

‘भूतम भयम्’मध्ये आणखी एक सरप्राईज, प्रियदर्शन जाधव साकारतोय रहस्यमय ‘मया’

जुलै 24, 2026 | 5:20 pm
Bhagyashree Nhavale Periods Awareness
Entertainment

“मी अजूनही बाजूला बसते”, मासिक पाळीबाबत अभिनेत्रीने मांडली तिची बाजू, म्हणाली, “देवाला जाणं…”

जुलै 24, 2026 | 11:11 am
salman khan appeal students at jantar mantar
Entertainment

“कृपया घरी परत जा”, जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सलमान खानचे भावनिक आवाहन, म्हणाला, ” पंतप्रधान मोदी…”

जुलै 24, 2026 | 10:15 am
parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Next Post
natasa stankovic meets hardik pandya mother

घटस्फोटाच्या दोन वर्षांनी पहिल्यांदा सासरी गेली सुप्रसिद्ध क्रिकेटरची पूर्वाश्रमीची पत्नी, स्वतःच शेअर केले फोटो, सासू आणि…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.