रविवार, जून 21, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘बालिका वधू’ फेम सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा थाटामाटात साखरपुडा, होणाऱ्या नवऱ्यासह शेअर केले रोमँटिक फोटो, शुभेच्छांचा वर्षाव

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जून 11, 2025 | 6:05 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Avika Gor Engaged

'बालिका वधू' फेम सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा थाटामाटात साखरपुडा, होणाऱ्या नवऱ्यासह शेअर केले रोमँटिक फोटो, शुभेच्छांचा वर्षाव

Avika Gor Engaged : टेलिव्हिजनवरील ‘बालिका वधू’ या लोकप्रिय मालिकेने प्रेक्षकांची मन जिंकली. ही मालिका घराघरांत लोकप्रिय झाली. मालिकेत आनंदीची भूमिका साकारणारी अविका गौरबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. अभिनेत्रीने तिचा साखरपुडा सोहळा उरकला असल्याचं समोर आलं आहे. अभिनेत्री बऱ्याच वर्षांपासून तिच्या प्रियकराला डेट करत होतो. तिने तिचा बॉयफ्रेंड मिलिंद चंदवानीबरोबर साखरपुडा केला आहे. या साखरपुडा सोहळ्याचे फोटो शेअर करत अविका हिने ही आनंदाची बातमी चाहत्यांसह शेअर केली आहे. अविका गौर हिने अगदी शाही पद्धतीने मिलिंद चांदवानीशी साखरपुडा केला. याचे फोटो पाहून चाहत्यांमध्ये आंनदाच वातावरण पाहायला मिळत आहे.

अविकाने तिच्या या खास दिवशी, हलकी गुलाबी रंगाची साडी परिधान केली. यासह, तिने स्लीव्हलेस ब्लाउज परिधान केला होता. तसेच मॅचिंग दागिने आणि मोकळ्या केसांसह तिने तिचा लूक पूर्ण केला. ज्यामध्ये ती खूप सुंदर दिसत होती. त्याच वेळी, मिलिंद चांदवानी यानेही बेज शेरवानी परिधान केली होती ज्यात तो खूपच हँडसम दिसत होता.

आणखी वाचा – एक नवं रुप, नव्या नात्यांसह…; ‘झी मराठी’ वाहिनीची अनोखी सुरुवात, नवीन अध्याय, नवीन वाटचाल सुरु करणार आणि…

View this post on Instagram

A post shared by Avika Gor (@avikagor)

अविका गौर हिने इन्स्टाग्रामवर तिच्या साखरपुडा सोहळ्याचे फोटो शेअर केले आहेत. यासह, तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “जेव्हा त्याने विचारले, मी हसले, मी ओरडले आणि माझ्या आयुष्यातील हा सर्वात सोपा हो होता. मी पूर्णपणे फिल्मी आहे. पार्श्वभूमी स्कोअर, स्लो-मो, स्वप्न पाहणे, मस्करा लावणे असं काही माझं सुरु असतं. तर याउलट तो तार्किक बोलतो, शांत आहे आणि माझ्याबरोबर फर्स्ट ऐड किट बरोबर घेऊन चालणार आहे”.

आणखी वाचा – ‘ठरलं तर मग’ फेम जुई गडकरीला झाली कावीळ, पाणी उकळून पिण्याचा दिला सल्ला, कावीळवरील रामबाण उपाय आहेत तरी काय…

अविकाने पुढे लिहिले, “मी थोडी ड्रामेबाज आहे, पण तो मला सांभाळतो. आणि अशाप्रकारे आम्ही दोघे एकमेकांशी फिट आहोत. म्हणून जेव्हा त्याने विचारले, तेव्हा माझ्या आतल्या नायिका जागी झाली. माझे हात हवेत होते, माझ्या डोळ्यात अश्रू आले आणि माझ्या मनाने काम करणे थांबवले. कारण हेच खरे प्रेम होते. हे नेहमीच परिपूर्ण असू शकत नाही परंतु ही जादू आहे”. मिलिंद चांदवानी याने अभिनेतीच्या या पोस्टवर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. कमेंट करत त्याने लिहिले आहे की, “रिअल पार्श्वभूमी संगीत माझ्या हृदयात200 बीपीएम इतके होते. तुझ्या होकाराने मला अचानक प्रत्येक चित्रपटाची ओळ समजू लागली. आपण एक नाटक आहात, आणि मी त्यांचे दिग्दर्शन करीत आहे, चला सर्वोत्कृष्ट चित्रपट बनवूया”.

Tags: Avika Gor Engagedentertainemnt newstelevision actress
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Prapti Redkar
Entertainment

‘सावली’ साकारताना संगीताशी घट्ट नातं जडलं, माझे माहेर पंढरी २.०’ शूट करताना प्राप्ती रेडकरला अश्रू अनावर

जून 20, 2026 | 3:16 pm
 kanika maheshwari faced harassment
Entertainment

अश्लील इशारे, घाणेरडी नजर आणि…; १३व्या वर्षी अभिनेत्रीसह घडला वाईट प्रकार, म्हणाली…

जून 20, 2026 | 1:00 pm
Raghavendra Rao Viral Video
Entertainment

दिग्दर्शकाचा स्वतःवरचा ताबा सुटला?, अभिनेत्रीला जवळ ओढलं आणि…; व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांचा संताप

जून 20, 2026 | 11:30 am
sunil grover sleeps on footpath
Entertainment

थेट फुटपाथवर चादर पसरून रात्र काढली, सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याला पाहून नेटकरी अवाक, म्हणाले

जून 20, 2026 | 9:40 am
Next Post
Aamit bhanushali talk about father

काम मिळत नसताना वडिलांची साथ, आता तेच नाही म्हणत रडू लागला ‘ठरलं तर मग’मधील अर्जुन, डोळ्यांत पाणी आणणारा व्हिडीओ

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.