‘जीव माझा गुंतला’ मालिकेतून लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजेच योगिता चव्हाण. ‘बिग बॉस मराठी’मुळे योगिता पुन्हा एकदा चर्चेत आलेली पाहायला मिळाली. योगिताने तिचा सहकलाकार सौरभ चौगुलेसह खऱ्या आयुष्यात लग्नगाठ बांधली. लग्नानंतर अवघ्या पाच महिन्यानंतर योगिताने ‘बिग बॉस’च्या घरात एन्ट्री घेतली. पहिल्याच दिवशी योगिता नवऱ्याच्या आठवणीत रडताना दिसली मात्र त्यानंतर तिने उत्तम खेळ खेळला. मात्र ‘बिग बॉस’च्या घरातील वातावरणात मानसिक त्रास होऊ लागला त्यावेळेला तिने घराबाहेर पडायचे असल्याची विनंती ‘बिग बॉस’ जवळ केली. मात्र त्यांनी योगिताची ही विनंती अमान्य केली. (Saorabh Choughule On Bigg Boss 5)
त्यानंतर आलेल्या एलिमिनेशनमध्ये अभिनेता निखिल दामले पाठोपाठ अभिनेत्री योगिता चव्हाणही घराबाहेर पडली. योगिता उत्तम खेळ खेळताना दिसली असली तरी ती मानसिक दृष्ट्या तितकी सक्षम नव्हती त्यामुळे तिला घरात वावरणं कठीण झालं असल्याचं तिनं मुलाखतींद्वारे सांगितलं. ‘बिग बॉस’च्या घरात वावरत असताना एका टास्कदरम्यान योगिता थेट निक्की व जान्हवीला एकटी भिडली. तेव्हा तिचं भरभरुन कौतुकही केलं. योगिताने घराबाहेर पडायचा घेतलेला हा निर्णय अनेकांना खटकलेला दिसला.
आणखी वाचा – Bigg Boss Marathi : “तुझं कोणी नाही पण मी आहे”, सूरजने निक्कीची काढली समजूत, म्हणाला, “एकटंच खेळायचं आणि…”
योगिता जेव्हा ‘बिग बॉस’च्या घरात होती तेव्हा तिचा नवरा सौरभ तिला बाहेरुन सपोर्ट करताना दिसला. शिवाय ‘बिग बॉस’ मधील न पडणाऱ्या मुद्द्यांवरही तो बरेचदा भाष्य करताना दिसला आहे. आता सुद्धा बिग बॉस मधून अरबाज पटेलची एक्झिट झाल्यानंतर निक्कीच्या झालेल्या अवस्थेवर सौरभचा एक गमतीशीर व्हिडीओ व्हायरल होत आहे आणि या व्हिडीओने साऱ्यांचच लक्ष वेधून घेतले आहे. योगिताने हा व्हिडीओ शूट करुन तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये अरबाज गेल्यानंतर निक्कीला अश्रू अनावर झाले आणि अरबाजला घराबाहेर काढू नका अशी विनंती ती ‘बिग बॉस’ला करताना दिसली.

अरबाज घरातून गेल्यानंतर ती घरात काय करणार असंही ती बोलताना दिसली यावरुन अनेकांनी तिला ट्रोलही केलं असल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान या व्हिडीओमध्ये सौरभ निक्कीची मिमिक्री करताना दिसत आहे. अरबाजसाठी निक्की कशी रडत होती हे तो दाखवत निक्कीची मिमिक्री करताना दिसतोय. तर हा व्हिडीओ तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन पोस्ट केला आहे. यापूर्वीही सौरभने निक्की व जान्हवीला टोला लगावत त्यांच्याबद्दल भाष्य करताना दिसला. आता अरबाजच्या एक्झिटनंतर पुन्हा एकदा निक्कीच्या मनोबलवर सौरभने केलेले हे भाष्य लक्षवेधी ठरतंय. हा व्हिडीओ रिपोस्ट करत, “बरं झालं बाबा तू बाहेर आलीस”, असं योगिताला म्हटलं आहे.