अनेक कलाकार जोड्या या प्रेक्षकांच्या आवडत्या जोड्या आहेत, कलाकारांची त्यांच्या खऱ्या आयुष्यातील जोडीदारासोबतची केमेस्ट्री बघायला प्रेक्षकांना कायमच आवडत. आणि अशीच एक हटके जोडी म्हणजे अभिनेत्री सुकन्या मोने आणि अभिनेता संजय मोने यांची.(Sukanya Sanjay Mone Yoga)
दोघेही अनेक माध्यमातून आपल्या सहज अभिनयाने बराच काळ प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत.आज आंतराष्ट्रीय योगा दिन आहे, आरोग्यदायी जीवनासाठी योगाच काय महत्व आहे हे सारेच जण जाणतात. याच योग दिनाचं औचित्य साधून अनेक कलाकारांनी त्यांचे योगा करतानाचे व्हिडिओ पोस्ट केले आहेत.याच कलाकारांच्या रांगेत सुकन्या आणि संजय मोने ही मागे राहिलेले नाहीत. सुकन्या यांनी संजय मोनेंन सोबतचा योगा करतानाच व्हिडिओ त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंट वरून शेअर केला आहे.
पाहा सुकन्या आणि संजय मोने यांचा योगा डे स्पेशल योगा (Sukanya Sanjay Mone Yoga)
या व्हिडिओच्या कॅप्शन मध्ये सुकन्या यांनी लिहलं आहे, आज योग दिवस,खरंतर गेले काही वर्षे काही न काही व्यायाम आम्ही दोघे करतच आहोत, संजयला जास्त करून वॉक आणि सायकलिंग जास्त आवडत आणि मला फिजिकल ट्रेनिंग. आम्ही दोघेही न चुकता रोज, नियमित व्यायाम आणि योगासन करतो. आपण आपल्या शरीराला,प्रत्येक अंगाला किती गृहीत धरलं होत इतक्या वर्ष,पण आता त्याच्याबरोबर मैत्री झालीय, त्या मैत्रीला जपायला हवं.रोज योग दिवस असतो.अनेक कलाकारांनी देखील कमेंट करून त्या दोघांचं कौतुक केलं आहे. तर मोने कुटुंबाचा हा योगा डे स्पेशल व्हिडिओ चर्चेत आहे.(Sukanya Sanjay Mone Yoga)

हे देखील वाचा : हास्यजत्रेच्या कलाकारांसोबत पार पडला शिवसेनेचा वर्धापन सोहळा
चित्रपट, नाटक , मालिका अशा सर्व माध्यमातून सुकन्या मोने आणि संजय मोने प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत.प्रेक्षकांनी देखील त्यांच्या या जोडीला भरभरून प्रेम देतात.