‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील सर्वच मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडताना दिसत आहेत. आशयघन कथानक असलेल्या या मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहेत. अशातच काही दिवसांपूर्वी सुरु झालेली ‘येड लागलं प्रेमाचं’ ही मालिकाही प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडत आहेत. ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘येड लागलं प्रेमाचं’ ही मालिका प्रेक्षकांच्या मनात घर करत आहे. या मालिकेत ‘बिग बॉस’ फेम जय दुधाणे व विशाल निकमची जोडी पाहायला मिळत होती. वेगळंच कथानक असलेली ही मालिका साऱ्यांच्या मनावर राज्य करत आहे. (Jay Dudhane Exit)
या मालिकेतून ‘बिग बॉस’ नंतर या जोडीला पुन्हा एकदा एकत्र पाहून त्यांचे चाहतेही खुश झालेले आहेत. ‘बिग बॉस’ मराठी सीजन ३ मध्ये जय दुधाणे व विशाल निकम एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून पाहायला मिळत आहेत. यावेळी मात्र ‘बिग बॉस’च्या ट्रॉफीवर विशाल निकमने नाव कोरले आहे. या सिझनमध्ये जय व विशाल यांची जुगलबंदी पाहायला मिळाली. जय व विशाल एकत्र दिसणार हे समोर आलं तेव्हा साऱ्यांच्या नजरा दोघांच्या एण्ट्रीकडे लागून राहिल्या.
‘येड लागलं प्रेमाचं’ या मालिकेत जय एका पोलीस इन्स्पेक्टरच्या भूमिकेत दिसला. मात्र आता जयने ही मालिका सोडली असल्याचं समोर आलं आहे. काही दिवसांपूर्वीच जयच्या वडिलांचे दुःखद निधन झाल्यामुळे त्याच्यावर मोठा आघात झाला. वैयक्तिक कारणामुळे तो ही मालिका सोडत असल्याच्या चर्चा सर्वत्र पसरल्या आहेत. आता जयची पोलीस इन्स्पेक्टरची भूमिका एक मराठमोळा अभिनेता साकारणार आहे.
मालिकेत आता जय दुधाणेची ही भूमिका अभिनेता संग्राम साळवी साकारताना दिसणार आहे. संग्रामच्या एण्ट्रीने आता प्रेक्षकांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे. संग्राम साळवीने यापूर्वी स्टार प्रवाह वरील ‘देवयानी’ या मालिकेत संग्राम विखे पाटील ही भूमिका गाजवली होती. या भूमिकेमुळे तो विशेष चर्चेत आला. आता संग्राम एका नव्या दमात पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. संग्रामच्या एण्ट्रीचा हा प्रोमो पाहून प्रेक्षकही त्यासाठी उत्सुक आहेत.