भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश व नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांचा शाही विवाह सोहळा १२ जुलै रोजी पार पडणार आहे. या शाही विवाह सोहळ्यासाठी जगभराती अनेक दिग्गजांना आमंत्रित करण्यात आले आहे. काही दिवसांपासून या शाही विवाहसोहळ्यासाठी अनेक दिग्गज व्यक्ती मुंबईमध्ये दाखल होत आहेत. हॉलिवूड सेलिब्रिटीदेखील आता भारतात या लग्नासाठी दाखल होत आहेत. नुकतेच हॉलीवूड अभिनेत्री व मॉडेल कीम कर्दाशियन पोहोचलेली दिसली. ती तिची बहीण क्लोइ कर्दाशियनबरोबर भारतात दाखल झाली आहे. याच बरोबर ‘काम डाउन’ फेम गायक रेमादेखील भारतात आला आहे. (john cena at ambani wedding)
मुंबई एअरपोर्टवर या सर्व कलकारांना स्पॉट केले असून त्यांचे अनेक फोटो व व्हिडीओ समोर आले आहेत. WWE फेम जॉन सिनाला देखील एअरपोर्ट वर स्पॉट केले गेले. त्याला बघता क्षणी पापाराजी त्याच्या मागे पडले आणि त्याच्या भोवती मोठ्या प्रमाणात गर्दी केली. समोर आलेल्या व्हिडीओमध्ये सगळे फोटोग्राफर्स जॉनला आवाज देताना दिसत आहेत. कोणी त्याला जॉन सर म्हणून हाक मारत आहे तर कोणी त्याला जॉन बाबू व काही तर जॉन दादा म्हणून हाक मारत आहेत.
आणखी वाचा –
याव्यतिरिक्त रॅपर व गायक रेमाचा व्हिडीओदेखील समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये त्याने डोक्यावर स्कार्फ घेतलेला दिसून येत आहे तर चेहऱ्यालादेखील मास्क लावला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रेमा इथे परफॉर्म करण्यासाठी २५ कोटी रुपये मानधन घेणार आहे. रेमाचा हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. नेटकऱ्यांनी रेमाच्या लूकची मस्करी केली असून तो संस्कारी असल्याचेही म्हंटले आहे.
आणखी वाचा –
कीम कर्दाशियन तिच्या बहिणीबरोबर दाखल झाली. त्यावेळी फोटोग्राफर्सनी तिच्या भोवती गराडा केला होता. यावेळी ती खूप सध्या लूकमध्ये दिसून आली. तसेच मुंबईमध्ये आल्या नंतर कीम व क्लोइने ऑटो रिक्षाने फिरण्याचा आनंददेखील घेतला.