भेसळयुक्त पदार्थ बाजारात असणं अनेकांना नवं नाही. कित्येकदा खराब पदार्थांची विक्री आणि त्यामधून होणारे त्रास उघडकीस येतात. इतकंच काय तर नामांकित कंपनींचं सामानही बऱ्याचदा खराब झालेलं असतं. मॅगी, खायचे इतर काही पदार्थ यामध्ये अळ्या झाल्या असल्याचे काही प्रकार उघडकीस आले होते. आता अशीच एक बाब समोर आली आहे. डी-मार्टमधील कॅडबरीमध्ये अळ्या व बुरशी असल्याचा प्रकार समोर आला आहे. मराठीतील सुप्रसिद्ध अभिनेत्रींनी हा संपूर्ण प्रकार समोर आणला. साताऱ्यातील डी-मार्टमध्ये खराब कॅडबरी असल्याचं उघडकीस आलं. मराठी मालिकांमध्ये काम करणारी अभिनेत्री ज्योत्सना पाटील व अंकिता पनवेलकर यांनी ही बाब समोर आणली. (worms and fungus in dairymilk Cadbury)
साताऱ्यामध्ये ज्योत्सना व अंकिता होत्या. त्यांना गोड खाण्याची इच्छा झाली म्हणून त्या तेथील डी-मार्टमध्ये गेल्या. बाहेर येऊन कॅडबरी खाण्यासाठी घेतली तेव्हा त्याला अळ्या, बुरशी असल्याचं निदर्शनास आलं. ज्योत्सना व अंकिता म्हणाली, “आता आम्ही साताऱ्याच्या डी-मार्टमध्ये आहोत. डी-मार्ट किंवा कोणत्या कंपनीची बदनामी करण्याचा, त्यांना दोष देण्याचा आमचा काही उद्देश नाही. आता आम्ही डी-मार्टमधून कॅडबरी घेतली. हे बघा तुम्ही बघू शकता. यामध्ये खरंच आळ्या आहेत”.
आणखी वाचा – सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीला करोना, मुंबईत पुन्हा वाढले रुग्ण, आता परिस्थिती अशी की…
पाहा व्हिडीओ
“कॅडबरीला भोकं पडली आहेत. त्याला बुरशी लागली आहे. आम्हाला गोड खायची इच्छा झाली म्हणून आम्ही कॅडबरी घेतली. नशिबाने दिवस होता, उजेड होता म्हणून आम्हाला हे पटकन दिसलं. हे भयंकर आहे. नशिबाने हे आम्ही सगळं बघितलं. लहान मुलाच्या हातात असतं तर त्याने पटकन खाल्लं असतं. रात्री आपण प्रवास करतो तेव्हा पटकन खातो. न बघता खाल्लं असतं तर हे सगळं पोटात गेलं असतं”.
आणखी वाचा – एकीकडे वडील गेले, अंत्यसंस्काराला जाताना लेकीनेही गमावला जीव, कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू अन्…
“इथे कोणालाच बदनाम करण्याचा उद्देश नाही. ज्यांचं हे प्रोडक्ट आहे त्यांनी पण याची काळजी घ्या. आपल्याकडून लोकांपर्यंत अशा पद्धतीच्या गोष्टी जात आहेत हे चांगलं नाही. ही गोष्ट अशी आहे की, लहान मुलं खूप खातात. विशेष म्हणजे ते हे न बघता खातात. त्यांचे पालकही त्यांना हे सगळं न बघता खायला देतात. इतकं कोणालाच हलक्यात घेऊ नका”. या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. हे खूपच गंभीर आहे, डी-मार्टमध्ये तुम्ही हे सगळं दाखवलं का?, ग्राहक कोर्टात तक्रार करा, डेरीमिल्क कंपनीही याला जबाबदार आहे अशा अनेक कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत.